Nashik News : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने नाशिक (Nashik) शहर पोलीस आयुक्तालयामार्फत स्वातंत्र्य दौडचे (Independance Day) आयोजन करण्यात आले होते. आज गंगापूर रोड (Gangapur Road) ते तपोवन असा दहा किलोमीटरचा पहिला टप्पा पार करण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस अधिकारी ते कर्मचारी येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत 75 कि.मी. अंतराची दौड पूर्ण करणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik CP Office) माध्यमातून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी पोलीस आयुक्तालयापासून करण्यात आला. पहिल्या टप्प्यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयापासून ते तपोवनपर्यंतची 10 कि.मी. अंतराची दौड आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश मोर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांची उपस्थित होते.
सदरील दौडला सोमवारी (ता.25) पहाटे पावणे सात वाजता गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयापासून प्रारंभ झाला. यावेळी नाशिककर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. सकाळी नाशिकच्या गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयापासून ते तपोवनातील संत जनार्दन स्वामी महाराज मठ येथील मार्गावर पहिला टप्पा पार पडला. या दौडमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार असून, यात सर्वसामान्य नागरिक, खेळाडूंनीही सहभागी यावेळी सहभागी झाले होते . तसेच नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले-श्रींगी देखील सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे 75 कि.मी. अंतराच्या दौडचा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा 10 कि.मी.चा सोमवारी (ता.25) पार पडला. या उपक्रमानुसार, शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्थात 14 ऑगस्टपर्यंत 75 कि.मी.चे अंतर धावून पूर्ण करणार आहे. 25 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान, प्रत्येक पोलीस अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या सोयीनुसार दररोज ठराविक अंतर धावतील आणि 14 ऑगस्टपर्यंत 75 कि.मी. अंतर पूर्ण करणार आहेत.
दरम्यान या उपक्रमानिमित्त पोलीस उपायुक्त अमोल तांबे म्हणाले कि, 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे 75 कि.मी. दौड हा उपक्रम राबविला जात आहे. यात 25 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान प्रत्येक पोलीस अधिकारी-कर्मचारी किमान ७५ कि.मी. दौड पूर्ण करणार आहे. यातून शारीरिक तंदुरुस्ती व सदृढतेचा संदेश दिला जाणार आहे.