Nashik Corona Update : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असून नाशिक शहरात मार्च नंतर पहिल्यांदाच एका दिवशी कोरोनाचे 16 रुग्ण बाधित आढळल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यास अटकाव करण्यासाठी आता पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्याचा विचार पालिकेने सुरु केला आहे.
दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने हाहाकार केल्यानंतर फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रादुभाव कमी झाला होता. जवळजवळ नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे महापालिका अलर्ट झाली असून मास्क सक्ती करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर मास्क संदर्भात राज्य शासनाच्या पुढील निर्देशांची वाट प्रशासन पाहत असून रुग्ण संख्या वाढत राहिली तर पालिका आपल्या स्तरावर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून नाशिकमध्येही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. जूनच्या गेल्या 13 दिवसांमध्येच कोरोनाचे तब्बल 105 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर गेल्या अडीच महिन्यातील कोरोनाचे सर्वाधिक १६ नवे रुग्ण आढळल्याने नाशिककरांवर कोरोनाची चौथ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तयारी केली आहे. त्यानुसार शहरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात आहे. तसेच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान नाशिकच्या विविध भागात करून उपचार केंद्र असून नागरिकांनी करून सदृश्य लक्षणे असल्यास अथवा बाधितांच्या संपर्कात आल्यास या केंद्रांवर जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी दोन्ही डॉस घ्यावेत , वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.
नाशिक शहरात सध्या 76 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. हे सर्व होम आयसोलेशनमध्ये एकही रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात दाखल नाही. 76 पैकी तेरा रुग्णांनाच कोरोनाची स्पष्ट लक्षणे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी अद्याप कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेली नाही. शासनाने निर्देशांची प्रशासनास प्रतीक्षा आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्ण बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा निबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.