Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न निवडणूक (Nashik Bajar Samiti) ऐन रंगात आली असतानाच माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shiwaji Chumble) यांना निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लाच प्रकरणात चुंभळेंना नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) अटक वॉरंट बजावल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर बाजार समिती निवडणूक मतदान होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 


ऑगस्ट 2019 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  (ACB) ई-नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना (Bribe Case) चुंभळे यांना अटक केली होती. जिल्हा न्यायालयाने पंचवटी पोलिसांवर कडक ताशेरे ओढत चुंभळेंना 26 जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिल्याने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत चुंभळे गटाला धक्का बसला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, सध्या अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत माजी सभापती देवीदास पिंगळेविरोधात माजी सभापती शिवाजी चुंभळेंनी भाजप-शिवसेनेचे एकीकडे भाजप-शिवसेनेतील इच्छुक पॅनल निर्माण करून आव्हान देण्याचा चुंभळेंचे नेतृत्व मानायला तयार प्रयत्न सुरू केला आहे. परंतु, हा प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट आला आहे. 


दरम्यान नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक  मतदान अवघ्या काही दिवसांवर आले असताना अशाप्रकारे चुंभळे विरोधात अटक वॉरंट जारी केल्याने निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. एकीकडे भाजप शिवसेनेतील इच्छुक चुंभळेंचे नेतृत्व मानायला तयार नसतानाच समितीच्या लाच प्रकरणात चुंभळेंची अडचण वाढली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना सदर आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चुंभळेंना वॉरंट जारी झाल्याने बाजार समितीचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारादरम्यान या कारवाईची कितपत झळ बसते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.


बाजार समिती निवडणुकीचे राजकारण तापले


नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ई-नाम योजनेच्या कामासाठी दहा कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले होते. चुंभळेच्या कार्यकाळात ई-नाम योजनेतील पाच कर्मचाऱ्यांना काही कारणास्तव काढून टाकण्यात आले. पुन्हा नाशिक कामावर रुजू होण्यासाठी राहुल थोरात यांनी सभापती चुंभळेंना रुजू करून घेण्याची विनंती केली असता चुंभळेनी त्यांच्याकडे अंदाजे दहा लाख रुपये लाचेची बाजार समितीची मागणी केली होती. त्यात तडजोड होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 ऑगस्ट 2019 रोजी चुंभळेंना तीन लाख रुपये स्वीकारताना पकडले होते. सदर प्रकरणी जिल्हा न्यायाधीश-8 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. शिंदे यांच्या न्यायालयात विशेष खटला सुरू असून, शनिवारी चुंभळेंच्या नावे पकड वॉरंट जारी करण्यात आले. 


काय म्हटलंय आदेशात ? 


दरम्यान पोलिसांच्या या अटक वॉरंट आदेशात शिवाजी चुंभळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक संशोधन अधिनियम 2018 चे कलम 7 प्रमाणे अपराधाचा आरोप करण्यात आलेला आहे. पंचवटी पोलिसांच्या नावे दिलेल्या आदेशात 'सदर संशयितास तुम्ही धरून माझ्यापुढे आणावे, तुम्हास या वॉरंटद्वारे हुकूम केला आहे. सदरहू संशयितास 26 जून 2023 रोजी माझ्यापुढे हजर होण्याविषयी व मी अन्य रीतीने हुकूम येईपर्यंत हजर होत राहतील. याविषयी आपण स्वतः तारण लिहून देऊन, पाच हजार रुपये रकमेचा एक जामीन द्याल, तर त्यास सोडून द्या,' असे म्हटले आहे.