Nashik Grapes Damage : राज्यातील अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) सोन्यासारख्या पिकांची माती झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून टपोरी द्राक्ष (Grapes Crop) पिकास रद्दी पेपरपेक्षाही कवडीमोल भाव मिळत असल्याचं चित्र आहे. शेतकऱ्याने साठ ते सत्तर रुपये किलोने ठरविलेले द्राक्ष आज निम्म्या भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सलग पाच दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागातील गहू, हरभरा, द्राक्ष पिकांना फटका बसला आहे. तब्बल दोन आठवड्यांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचा प्रचंड नुकसान झाले. अगदी रद्दीला मिळावा, याहीपेक्षा कमी मोल भाव द्राक्षांना मिळत आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदार झाला असून कर्मचारी संपावर गेल्याने नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 


नाशिक जिल्ह्याला गेल्या दोन आठवड्यापासून अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. काढणीला आलेला गहू, द्राक्ष, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान होतं. आहे. सद्यस्थितीत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी जागेवर नाहीत. शिवाय सात दिवसांनंतर आज संप मिटला आहे, त्यानंतर आता उद्यापासून पंचनामे होण्यास सुरुवात होईल, तेव्हा कुठं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतील, मग मदत मिळण्यासाठी आणखी अवधी लागेल? मात्र त्या आधीच शेतकरी आर्थिक संकटात द्राक्षांना सापडला आहे. 


दरम्यान नाशिक मधील एका मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने अडीच एकरवर द्राक्ष बॅग फुलवली होती. सुरवातीला मार्केटही मिळणार होत. त्यासाठी बरेच मेहनत देखील घेतली होती. मात्र मागील काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे पूर्णतः नुकसान झाले आहे. सुरुवातीला तीन एकरचा बाग विक्रीसाठी होता, मात्र अवघा दहा टक्के सुद्धा माल देण्यासारखा राहिला असून त्यातून लागवड खर्च सुद्धा सुटणार नसल्याचे तरुण शेतकऱ्यांने सांगितले.  


राज्यभरात पिकांचे नुकसान 


राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू आणि संत्री बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचं अतोनात नुकसान झालं आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. आजच त्यांचाही संप मिटला आहे. त्यामुळे आता पंचनामे कधी सुरु होतील आणि नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.