Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashikroad Railway Station) दाखल झाले असून आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकला निघाले होते. नुकतेच त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. असंख्य कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित असून आज नाशिक शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला दाखल झाले आहेत.
आज नाशिक (Nashik) शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी अजित पवार हे नाशिकला दाखल झाले असून नुकतचं त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. आज सकाळीच पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसने (Vande Bharat) ते नाशिकला पोहचले आहेत. यावेळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान, अजित पवार हे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनतर पायी चालत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर आता ते शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले आहेत. यादरम्यान मोठे शक्तिप्रदर्शन अजित पवार यांच्याकडून करण्याचे येत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमदार सरोज अहिरे देखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे काही मिनिटांपूर्वी सरोज अहिरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केल्यांनतर लागलीच त्यांचे स्वागत अहिरे यांनी केले आहे.
सरोज अहिरे अजित दादांसोबत
अनेक दिवसांपासून भूमिका जाहीर करू न शकलेल्या आमदार सरोज अहिरे यांनी आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. 'मतदार संघातील विकास खुंटला आहे. अनेक विकास काम थांबून आहेत आणि ही विकास काम सुरू होण्यासाठी थांबलेले विकास कामांना गती मिळण्यासाठी सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे सरोज अहिरे म्हणाल्या आहेत. दरम्यान सरोज अहिरे यांनी पहिल्यांदा आपली भूमिका एबीपी माझाला दिलेली आहे. त्या अजित पवार यांच्या सोबत राहणार आहेत. मतदारसंघातील विकास काम ही झाली पाहिजेत, हीच इथल्या मतदारांची मागणी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Shasan Aaplya Dari Nasik: शासन आपल्या दारी कार्यक्रमाला कुणा कुणाची हजेरी ?