Nashik Grampanchayat Election : नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यात (Dindori) काल दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने पार नदीला पूर येऊन पुलावरून पाणी गेले होते. यामुळे देहरे गावातील प्रभाग 3 चे निवडणूक पथक सायंकाळी ईव्हीएम मशीनसह (EVM Machine) अडकून पडले होते. प्रशासनाच्या निवडणूक पथकातील 5 कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम सुरक्षित रहावे, यासाठी देहरे मतदान केंद्रावरच रात्र जागून काढली. सकाळी पाऊस ओसरताच पथक सुखरूपपणे मतदान मोजणी केंद्रावर पोहचले. अन सर्वानी सुटकेचा निस्वास सोडला. 


नाशिक जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Election) आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून भर पावसात सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेत खंड न पडता साधारण 80 टक्के मतदान झाले. यंदा प्रथमच थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाल्यामुळे मतदारांसह उमदेवारांमध्येही उत्सुकता असून तिन्ही तालुक्यात मतदान शांतते झाले. सकाळपासून निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. तत्पूर्वी काल दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे भर पावसात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र यावेळी दिंडोरी तालुक्यात सुरु झालेल्या पावसामुळे निवडणुक पथकाची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. 


दरम्यान दिंडोरी तालुक्यात 46 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया काल पार पडली. मात्र दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. अशातच भर पावसात मतदान केंद्रावर नागरिकांनी येत मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सायंकाळी पावसाचा जजोर अधिक वाढल्याने दिंडोरी तालुक्यातही महत्वाची नदी असलेल्या पार नदीला पूर आला. यामुळे मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीन नेण्या अडचणी आल्या. पार नदीला पूर आल्याने ईव्हीएम मशीनसह निवडणूक पथक मतदान केंद्रावर अडकून पडले होते. 


या मतदान केंद्रावरील प्रकार 
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने पार नदीला पूर येऊन पुलावरून पाणी गेले होते. यामुळे देहरे गावातील प्रभाग 3 चे निवडणूक पथक सायंकाळी ईव्हीएम मशीनसह अडकून पडले होते. प्रशासनाच्या निवडणूक पथकातील 5 कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम सुरक्षित रहावे, यासाठी देहरे मतदान केंद्रावरच रात्र जागून काढली.  ईव्हीएम अडकल्याने प्रशासकीय यंत्रणा चिंतेत होत्या. मात्र सकाळी पुराचे पाणी थोड्या प्रमाणात ओसरताच पथक सुखरूपपणे ईव्हीएम मशीन घेऊन मतमोजणी केंद्रावर पोहोचले. तहसिलदार पंकज पवारांच्या हस्ते या पथकाचा यावेळी सत्कार करण्यात आला.


पहिला निकाल हाती 
दरम्यान दिंडोरी तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींच्या मतमोजणी कार्यक्रमाला सुरवात जाई असून पहिला निकाल हाती आला आहे. यानुसार दिंडोरी तालुक्यातून पहिला निकाल हाती आला असून तालुकयातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वणीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे मधुकर भरसट विजयी झाले आहेत.