नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र याआधीच नरहरी झिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) मला दुरून आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण दिंडोरीतून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ दिंडोरीतून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते धनराज महाले इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी धनराज महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला जाणार असल्याने धनराज महाले यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 


शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद : नरहरी झिरवाळ


आता दिंडोरीच्या निवडणुकीबाबत बोलताना नरहरी झिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद राहणार आहेत, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तर धनराज महाले यांना मी विनंती करणार आहे. ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असा मला विश्वास असल्याचे देखील नरहरी झिरवाळ म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर मला दिंडोरीतील मतदार निवडून देतील. मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून 100 टक्के निवडून येणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आता शरद पवार दिंडोरीतून निवडणुकीसाठी नेमकं कोणाला रिंगणात उतरवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच