नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. विधानसभेच्या तोंडावर भुजबळ-कांदे यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.  माजी आमदार संजय पवार (Sanjay Pawar) व माजी नगराध्यक्ष बबलू पाटील (Bablu Patil) हे भयभीत होवून आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याकडे गेल्याचा आरोप माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी केला होता. आता समीर भुजबळांच्या आरोपाला संजय पवार व बबलू पाटील यांनी उत्तर दिले आहे.


संजय पवार म्हणाले की, मी घाबरून कोणाकडे जाणे आणि राजकारण करणे हे आम्हाला शिकवलेले नाही. ज्यांनी नांदगाव-मनमाडचा पाणी प्रश्न सोडवला. ज्यांनी नांदगावला विकासाच्या दिशेने नेले त्या आमदार सुहास कांदे यांच्या सोबत आम्ही आहोत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिली आहे. उलट भुजबळ यांनी माझे बाजार समितीचे पद घालवले. समीर भुजबळांनी आमच्या नावाचा वापर करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरोप केले आहेत, असा पलटवार देखील त्यांनी केला आहे. 


भुजबळांनी मोठा भ्रष्टाचार केला अन् मग ते जेलमध्ये गेले


मंत्री छगन भुजबळ यांनी माझे बाजार समिती संचालकांचे पद घालविले. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे की, मनमाड बाजार समितीच्या सर्व संचालकांचे राजीनामे द्या आणि माझ्या समोर निवडणुका लढवा. मंत्री भुजबळ यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करत DDR यांच्यावर दबाव आणून माझे बाजार समितीचे पद काढले. भुजबळांनी मोठा भ्रष्टाचार केला अन् मग ते जेलमध्ये गेले, असा आरोप संजय पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलाय. 


खोटे नाटे आरोप करू नका


समीर भुजबळांना मी माझे वकीलपत्र दिलेले नाही. खोटे नाटे आरोप करू नका. भुजबळ हे निवडणुका मॅनेज करून लढवातात. नांदगाव, मनमाडचा पाणीप्रश्न सुहास कांदे यांनी सोडविला. एमआयडीसी मंजूर केली. मी सुहास कांदे यांच्याकडून खोके घेवून उत्तर द्यायला नाही आलो. भुजबळांनी खोके देवून उद्धव ठाकरे यांना मॅनेज केले होते. तुम्हाला तुम्ही मंत्री, पोरगा आमदार, पुतण्या खासदार हे सगळे तुम्हाला घरात पाहिजे होते. मंत्री भुजबळ यांचे नाव या मतदारसंघात कोणी घेत नव्हते. मनमाड बाजार समिती मी निवडून आणली. मी घाबरून कांदे यांना जॉईन झालो हे म्हणणे चुकीचे आहे. समीर भुजबळांकडे या निवडणुकीत मुद्दे नाहीत. म्हणून ते आमचे नाव घेवून खोटे आरोप करत आहेत. मात्र आम्ही नांदगाव मतदारसंघाच्या विकासासोबत असल्याचे देखील संजय पवार यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Babanrao Gholap : ठाकरेंनी मुलाला तिकीट देताच शिंदे गटाच्या बबनराव घोलपांचा राजीनामा; म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार!