Nashik News : 'माय मरो आणि मावशी  जगो' अशी आईपणाची महती सांगणारी म्हण माणसांसह पशुपक्षांनाही लागू पडते. याचा प्रत्यय आला सहायक वनसंरक्षक सुजित नेवसे (Sujit Nevse) यांना, सापडलेल्या मोर मादी लांडोराचे 5 अंडे कोंबडी खाली उबवून त्यातून चार पिल्ले निघाली आणि कोंबडीने अगदी सख्ख्या आई प्रमाणे पिल्लांना संभाळल्याची घटना निफाड (Niphad) वनहद्दीत घडली.  


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड (Niphad) हे वन्यप्राण्यांसाठी नेहमीच लाभदायक ठरले आहे. येथिल नांदुरमाध्यमेश्वर (Nandurmadhyameshwer) अभयारण्य असो शेती मळे परिसर, इथे नेहमीच वन्यप्राण्यांचा राबता असतो. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी मनमाड (Manmad) येथील सहायक वन संरक्षक सुजित नेवसे हे नांदगावच्या (Nandgoan) ग्रामीण भागात फिरताना फिरत असताना गवतावर पाच अंडी दिसली, ती कोणत्या पक्षाची आहेत. हे ओळखून इतर कोणाचा पाय पडून ती फुटतील म्हणून त्यांनी ती अंडी निफाड येथे असलेल्या वनोदयानात वनपाल भगवान जाधव यांच्याकडे सुपूर्द करत काळजी घेण्यास सांगितले.


भगवान जाधव यांनी बाजारातून एक कोंबडी विकत आणत त्या कोंबडीने पाचही अंडे उबवले असता त्यातून लांडोरच्या पिल्लांनी जन्म दिला. आता हेही पिल्लं आपलेच आहेत. असे समजून त्या कोंबडीने या लांडोराच्या पिल्लांचेही पालन, पोषण सुरू केले. हळू, हळू ही पिल्ले कोंबडी सोबत फिरू लागली. सदर लांडोराची पिल्लं आता तीन महिन्याची झाली आहेत. ही कोंबडी लांडोराच्या पिल्लांना माया व प्रेम देते.


लांडोराचे पिल्लू आपलेच समजून कोंबडी माया देत आहे.कोंबडीने आवाज दिल्याबरोबर मोराची पिल्ले कोंबडीकडे धावून येतात. मात्र ही पिल्ले लहान असल्याने नर आहे की मादी हे कळू शकते नसल्याचे भगवान जाधव यांनी सांगितले. दरम्यान वनपाल भगवान जाधव, वन मजूर चंद्रकांत गावित, भारत माळी,सादिक शेख आदी मोरांची काळजी करत आहे.


लांडोर अंडयांना सोडून देतात... 
प्रजनन काळात लांडोर हे शेताच्या बांधावर, जमिनीवर अंडी घालतात किंवा काटेरी वनस्पतींमध्ये लपवतात. ही अंडी माणसाला सापडल्यास किंवा या अधिवासाला धोका निर्माण झाल्यास लांडोर आपल्या अंड्यांना सोडून देतात. दरम्यान वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत मोर हा पक्षी शेड्यूल एकमध्ये असल्याने मोर पाळणे, त्याला किंवा त्यांच्या अंड्यांना हाताळणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु वन विभागाच्या सहकार्याने ही अंडी कृत्रिम अधिवासात उबविण्यात आली आणि पिल्लांना जन्म देण्यात आला. मादी मोर वर्षातून दोनदा अंडी घालतात. ती एका वेळी 4 ते 5 अंडी घालू शकते. मोर प्रजननासाठी घरटे बांधत नाहीत तर नैसर्गिक अधिवासात खड्ड्यात अंडी घालतात. मोराची अंडी बाहेर येण्यासाठी सुमारे 25 ते 30 दिवस लागतात. तर मोराच्या पिल्लांना पूर्ण वाढ होण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागतो.