Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकच्या जागेवरून पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील या जागेसाठी जोर लावला आहे. 


शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकच्या जागेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ वाजे यांनी प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. तर महायुतीत मात्र छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. तर भाजपकडून (BJP) देखील नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आल्याने नाशिकच्या जागेचा गुंता अजूनही सुटलेला नाही.  


नाशिकचं राजकीय वातावरण तापलं


उमेदवारीसाठी हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा एकदा मुंबई गाठले आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. तर छगन भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024) गाठीभेटी घेतल्या आहेत. छगन भुजबळांकडून एक प्रकारे प्रचाराची सुरुवात झाल्याची चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागली आहे. यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. 


गोडसेंची तिकिटासाठी फिल्डिंग, भुजबळांकडून गाठीभेटी


छगन भुजबळ नाशिकमधील विविध ठिकाणी भेट देत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत भुजबळ नाशिककरांना शुभेच्छा देत आहेत. एकीकडे हेमंत गोडसे मुंबईत जात तिकीटासाठी फिल्डिंग लावत असताना भुजबळ मात्र नागरिकांच्या गाठीभेटी घेत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता नाशिकच्या जागेवरून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


नाशिकच्या जागेबाबत काय म्हणाले छगन भुजबळ? 


जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन होत नाही. अधिकृतरित्या जाहीर होत नाही. तोपर्यंत महायुतीच्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. उमेदवाराचे नाव जाहीर होईल. त्यावेळेला आम्ही सगळेच एकत्रित काम करू. नाशिकची निवडणूक महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात आहे. इतर ठिकाणी तिथल्या वाटाघाटी ताबडतोब आटोपल्या आहेत. काही निवडणुका दोन दिवसात आहेत. काहींचे दुसरा टप्प्यातील फॉर्म भरायचे सुरू आहे. तिथल्या वाटाघाटी करण्याकडे निवडणुकीसाठी सगळ्यांचे लक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Loksabha : नाशिकच्या जागेवर वंचितचा 'वेट अँड वॉच', महायुतीच्या उमेदवारीनंतरच प्रकाश आंबेडकर पत्ता खोलणार?