Governor Ramesh Bais नाशिक : राज्यपाल रमेश बैस हे आज शुक्रवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत. नुकतेच त्यांचे पोलीस कवायत मैदानावर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांसोबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) देखील उपस्थित आहे. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांकडून (Nashik Police) चोख पोलीस बंदाबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या हस्ते काळाराम मंदिरात पूजाविधी
पोलीस कवायत मैदानावरून राज्यपाल नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरात (kalaram Mandir) दाखल झाले. यावेळी काळाराम मंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती व पूजाविधी करण्यात आली.
याप्रसंगी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपलिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी आदी उपस्थित होते. काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल रमेश बैस हे मोटारीने त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाऊंडेशन येथे नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्त झाले.
राज्यपाल मंदिरात दाखल होताच संपूर्ण परिसर मोकळा
राज्यपाल रमेश बैस हे काळाराम मंदिराच्या परिसरात दाखल होताच परिसरात संपूर्णपणे मोकळा करण्यात आला होता. राज्यपाल मंदिर परिसरातून बाहेर जात नाही तोपर्यंत काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना मंदिर परिसरात जाण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे भाविकांना तात्कळत राहावे लागले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४५० पोलिसांचा ताफा शहरात तैनात करण्यात आला. काळाराम मंदिर परिसरात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सुमारे १५० जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय शीघ्रकृती दलासह राखीव तुकडीही सज्ज ठेवण्यात आली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक, 25 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 450 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Bus Accident : स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस आदळली झाडावर; चालक-वाहकासह 17 प्रवासी जखमी