Nashik Bus Accident News नाशिक : नाशिक जिल्ह्यात अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी रात्री देवळा (Deola) शहरानजिक असलेल्या सप्तश्रृंगीनगर जवळ कळवण-मालेगाव बसचा (Bus Accident) अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात चालक, वाहकासह बसमधील 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


टायर फुटलं अन् बस आदळली झाडावर


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळवण-मालेगाव ही बस (Kalwan-Malegaon Bus) गुरुवारी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तश्रृंगीनगराजवळ येत असताना स्टेअरिंग रॉड तुटल्याने उजव्या बाजूच्या विजेच्या खांबाला बसची धडक बसली. त्यानंतर टायर फुटले आणि बस डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर आदळली. या अपघातात (Accident) एकूण 17 जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली. अपघात घडल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) प्राथमिक उपचारासाठी (Treatment) दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कळवण, मालेगाव, चांदवड, नाशिक, चांदवड आदी ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले.


अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे


पुरुषोत्तम देवबा ठाकरे - चालक (46), वाय एस महाले - वाहक (30), राहुल राजू कचवे (30), अकबर अली शहा (50), भिका रुपसिंग सोळंके (75), अरविंद गणपतराव जोंधळे (65), पांडुरंग शंकर साठे (64),  हर्षल युवराज पगार (20), कोमल विकास शिरसाठ (20), मोहम्मद मनु (25), सविता भावराव सूर्यवंशी (43), ओंकार बाबासाहेब येरुळे (20), मेहेरदिन अब्दुल गफर (34), आकाश कृष्णा गांगुर्डे (24), लखन हरी सोनवणे (40), योगिता लखन सोनवणे (35), उषाबाई पोपट थोरात (48), अशी अपघातात जखमी (Injured) झालेल्यांची नावे आहेत. 


दरम्यान, जखमींना बसमधून बाहेर काढण्यात दवाखान्यात नेण्यासाठी संभादादा मित्रमंडळ, शिवराजे मित्र मंडळ यांच्यासह इतरांनी सहकार्य केले. देवळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचीही मदत मिळाली. तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, ज्योती गोसावी, आगारप्रमुख संदीप बेलदार, राजेंद्र आहिरे उपस्थित होते. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Political News : नाशकात भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा?; शहराध्यक्षांचे भावी आमदार म्हणून झळकले होर्डिंग्ज


Nashik News : दुर्दैवी! नाशिकमधील 'त्या' गॅस गळतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू; चार दिवस मृत्यूशी झुंज अपयशी