Girish Mahajan on Tapovan Trees: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील तब्बल 17 हजार झाडांवर कुऱ्हाड चालवणार जाणार आहे. यावरुन सध्या नाशिकमधील नागरिकांचे तीव्र आंदोलन उभे राहिले आहे. तपोवनातील अनेक वर्षांपासून असलेली झाडे (Tapovan Trees) काही दिवसांच्या कुंभमेळ्यासाठी तोडण्याला नाशिकमधील (Nashik news) नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महायुती सरकार आणि भाजपची बाजू मांडली. आम्हीसुद्धा वृक्षप्रेमी आहोत. सरकारची भूमिका, देवेंद्रजींची भूमिका, मोदीजींची भूमिका, याबाबत स्पष्ट आहे. आम्ही तपोवनातील तोडण्यात येणार्या झाडांच्या मोबदल्यात इतर ठिकाणी झाडं लावणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. ते शुक्रवारी मालेगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते. (Nashik Sadhugram news)
आम्ही पावसाळ्यात किती ठिकाणी वृक्ष लावतो. वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही. पण तपोवनातील जागा साधुग्रामसाठी शेकडो वर्षांपासून आरक्षित आहे. त्या ठिकाणी आता उगवून आलेली झाडे मागच्यावेळीही काढलेली होती. मोठी झाडे जी आहेत आम्ही त्या कोणालाही हात लावत नाही. जी झाडे या पाच-सात वर्षात उगवलेली आहेत, रोपटी आहेत त्यांनाच आम्ही हात लावणार आहोत. जे सात आठ वर्षातली प्लांटेशन आहेत ते आम्ही दुसरीकडे काढून लावणार आहोत. त्यासाठी चार-पाच जागा आम्ही शोधलेल्या आहेत. आम्ही कालपासून पंधरा हजार खड्डे करायला सुरुवात केली आहेत. मी स्वतः हैदराबादला जाऊन आठ फुटी, दहा फुटी झाडे आणून त्या ठिकाणी लावणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
येत्या दोन वर्षात तपोवनात कसा बदल होणार, ते तुम्ही बघा. आम्ही येथील मोठी झाडं 100 टक्के जगवणार आहोत. साधूग्रामला ती जागा आवश्यक आहे, शेकडो वर्षापासून साधू तेथे राहत असल्याची ती परंपरा आहे. थोडी आमची ही भूमिका समजून घ्या. कुंभमेळा हा आपला सर्वात मोठा धार्मिक उत्सव सोहळा आहे. वृक्षतोड होईल त्यामुळे आम्ही वृक्षतोडण्याच्या मागे लागलो आहोत असे समजायचे काही कारण नाही. १०० टक्के सांगतो, एका झाडाला दहा नाही तर पंधरा झाडे लावतो. हजार झाडे तोडल्यावर आम्ही पंधरा हजार झाडे लावणार आहोत. जो खर्च येईल ती महापालिका या ठिकाणी करेल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
आणखी वाचा