Gaju Ghodke on Sunil Bagul and Mama Rajwade : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुनील बागुल (Sunil Bagul) आणि मामा राजवाडे (Mama Rajwade) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार गजू घोडके (Gaju Ghodke) यांनी मागे घेतली आहे. या निर्णयामुळे बागुल आणि राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, सोमवारी सुनील बागुल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती, मात्र तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने बागुल यांनी स्वतःचा जामीन अर्जही मागे घेतला. तक्रारदार गजू घोडके यांनी पोलिसांना लेखी पत्र सादर करून स्पष्ट केले की, "या दोघांनी मला कोणतीही मारहाण केलेली नाही, त्यामुळे माझी तक्रार मागे घेत आहे." त्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्हा रद्द केला आहे. आता गुजू घोडके यांनी तक्रार काय मागे घेतली? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

तक्रारदार गजू घोडके म्हणाले की, गुन्हे मागे घेण्यापेक्षा आम्ही धर्माचे काम करतो. त्यामुळे सामाजिक, राजकीय काम करताना मतभेद होत असतात. आमच्या परिवारावर आले त्यावेळी आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले. सर्व गोष्टी बोलता येत नाही. हिंदू राष्ट्र बनावे ही इच्छा आहे. सुनील बागुल यांच्यासारखे लोक पक्षात येत आहेत म्हणून मी भूमिका घेतली. ते आता कुठल्या पक्षात जातील हे माहित नाही, असे त्यांनी म्हटले. 

मी भाजपचं नाही तर आरएसएसचे काम करतो

गजू घोडके पुढे म्हणाले की, मी भाजपचं नाही तर आरएसएसचे काम करत असतो.  राजकीय सूडबुद्धीने काही केले नाही. मतभेद असतात त्यातून हे होते. सुनील बागुल यांच्या संदर्भात मी पोस्ट टाकली. त्यातून क्लेश निर्माण झाला. संघाची प्रतिमा शांत प्रिय नाही. संघ सांगतो आमच्याकडे यायचे असेल तर वेळ प्रसंगी मरावं देखील लागेल. संघ हा शांत प्रिय आहे ही चुकीची गोष्ट आहे. गोरक्षा करत असताना दोन हत्या झाल्या, त्याची जबाबदारी आम्ही घेतली होती. धर्मासाठी आम्ही जीव द्यायला देखील तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

सुनील बागुल, मामा राजवाडे पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार?

दरम्यान, सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे काही दिवसांपासून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार होते. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुन्हा दाखल झालेल्या दोघांना भाजप 'पावन' करून घेणार, असा आरोप केला होता.  यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, यामुळे या दोघांचा पक्षप्रवेश थांबवण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतरच या दोघांचा भाजप प्रवेशाचे भवितव्य अवलंबून होते. मात्र आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेण्याबाबत अर्ज दिल्याने सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा लवकरच भाजपप्रवेश होणार आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून दोघे नेते पुढील आठवड्यात भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आणखी वाचा 

Nashik Politics : मामा राजवाडेंनी ठाकरे गटाला 'मामा' बनवलं; आता उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील 'या' नेत्याची ताकद वाढवली