Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency)दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori Lok Sabha Constituency) आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत अर्जविक्री व दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 3 मेपर्यंत आहे. 


लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यात २० मे रोजी नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणुकीकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा मुख्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


भुजबळांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला उमेदवारी अर्ज


नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अजूनही तिढा कायम आहे. नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे इच्छुक होते. मात्र काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर माघार घेतली. आता छगन भुजबळांच्या माघारीनंतर त्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिलीप खैरे (Dilip Khaire) यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी अर्ज घेतला आहे. नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण असणार हे निश्चित होण्याआधीच महायुतीतील नेत्यांकडून अर्ज घेण्यास सुरुवात झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


असा आहे नाशिक, दिंडोरी लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम


निवडणूक अधिसूचना घोषित करणे : 26 एप्रिल
उमेदवारी अर्ज भरणे : 26 एप्रिल ते 3 मे (सार्वजनिक सुटीवगळून)
दाखल अर्जाची छाननी : 4 मे
अर्ज माघारी : 6 मे (दुपारी 3 पर्यंत)
मतदान : 20 मे (सकाळी 7 ते सायंकाळी 5)
मतमोजणी : 4 जून (सकाळी 8 पासून)


राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे 29 एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज


दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ वाजे व भास्कर भगरे हे जोरदार शक्तीप्रदर्शन करत 29 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज