Eknath Shinde: एकनाथ शिंदे कधी झोपतो, कधी उठतो हा प्रश्न विरोधकांना पडत असतो. मी नेहमी इतरांच्या झोपा मोडत असतो. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते आज नाशिकमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना शिंदे यांनी सांगितले की धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत आहे.
लोकाभिमुख कामे झाली पाहिजे
एकनाथ शिंदे म्हणाले की, धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत आहे. दिवा बत्ती, रस्ते पाहिजे असतील तर परिवर्तन आवश्यक आहे. पब्लिकचा पैसा, जनतेचा पैसा वाया जात कामा नये. लोकाभिमुख कामे झाली पाहिजेत. आचारसंहिता संपल्या संपल्या प्रस्ताव सादर करा आणि पाण्याच्या लाईनचे काम करा. टोल नाका मी काढून टाकला, 365 दिवस पाणी पुरवठा केला पाहिजे. त्र्यंबकेश्वरला हेरिटेज सिटी केली पाहिजे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकास होणार आहे. जबरदस्तीने विकास होणार नसल्याचे ते म्हणाले. आदिवासी समाजाच्या बांधवांच्या वस्ती कायम करून त्यांना हक्काचे घर देऊ, जुने वाडे हेरिटेज आहेत, त्यासाठी नियोजन करू. नगरविकास खात्याच्या माध्यमातून जे जे शक्य आहे ते करू, असे आवाहन त्यांनी केले.
तोच करिश्मा पुन्हा एकदा करून दाखवावा
दरम्यान, कन्नडमध्ये बोलताना शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, कन्नड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून इथे माझी लाडकी बहिण संजना जाधव ही आमदार आहे. आणि आता अनिता कवडे यांच्या रूपाने आणखी एक लाडकी बहिण तुमच्या सेवेत दाखल होत आहे. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत जो करिष्मा करून दाखवला तोच आता पुन्हा एकदा करून दाखवावा असे आवाहन केले. राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आपण लाडकी बहिण योजना सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली. आता तर फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नसून त्यांना नगरविकास विभागाच्या माध्यमातून खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
कन्नड मध्ये उत्तम रस्ते, चांगल्या आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा योजना, उत्तम क्रीडांगणे, मैदाने, अभ्यासिका हे सगळे हवे असल्यास शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी नक्की निधी उपलब्ध करून देऊ असेही शिंदे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या