नाशिक : एक साधा शिक्षक खासदार झालो ती किमया म्हणजे शरद पवार आहेत, असे कौतुक दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी शरद पवारांचे केले. तर नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) चेहरा आता जवळून पाहायला मिळतो, तो चेहरा पडलेला दिसतो, छप्पन इंच की छाती आज काय झाली ते आम्ही बघतोय. विरोधक त्यांच्यावर आता तुटून पडतात, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. नाशिक येथे आयोजित शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) निष्ठावंतांच्या मेळाव्यातून भास्कर भगरे बोलत होते.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) यश मिळाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी शरद पवार गटाने कामाबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिक दौरा केला. शरद पवारांच्या पाठोपाठ जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. तसेच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी दिंडोरीत भास्कर भगरे यांचा विजय झाला त्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
छप्पन इंच की छाती आज काय झालीय?
या मेळाव्यात भाषण करताना भास्कर भगरे म्हणाले की, मी निष्ठावंतांच्या मेळाव्यात सांगतोय की, निष्ठावंताचे फळ काय असते ते म्हणजे मी. मी एक साधा शिक्षक खासदार झालो ती किमया म्हणजे शरद पवार आहेत, असे कौतुक त्यांनी यावेळी शरद पवारांचे केले. तर नरेंद्र मोदींचा चेहरा आता जवळून पाहायला मिळतो, तो चेहरा पडलेला दिसतो, छप्पन इंच की छाती आज काय झाली ते आम्ही बघतोय. विरोधक त्यांच्यावर आता तुटून पडतात, असा निशाणा त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला.
विधानसभा निवडणुकीत यश मिळवायला तयार व्हा
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) यश मिळवायला तयार व्हा, असे आवाहन भास्कर भगरे यांनी कार्यकर्त्यांना केले. तर दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत भगरे सर नावाचा डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला होता. या डमी उमेदवाराला 1 लाखांहून अधिक मते मिळाली. यावरही भास्कर भगरे यांनी भाष्य केले. विरोधक आता नको त्याला सर करता आणि माझ्यासारख्या खऱ्या शिक्षकाला त्याचा त्रास होतो, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा