Devendra Fadnavis : काहीजण फक्त भगवा मिरवण्याचं काम करत आहेत. महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपवर आहे. असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले, ते आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले, यावेळी ते म्हणाले, देशातील जनेतचा आशिर्वाद केवळ भाजपलाच मिळाला आहे, नाशिक महापालिकेवर भगवा फडकणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. आणखी काय म्हणाले फडणवीस?
काहीजण फक्त भगवा मिरवण्याचं काम करत आहेत
आपल्याकडे नरेंद्र मोदी सारखा नेता आहे ही आपली ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कमी होते तरी ते मुघलांवर तुटून पडायचे तसेच शिवाजी महाराजांना मानणारे मोदी आपल्यासोबत आहे. महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपवर असून काहीजण फक्त भगवा मिरवण्याचं काम करत आहेत. काहींनी दत्तकचा अर्थ वेगळा घेतला, दत्तक म्हटल्यावर इतरांना वाटले आम्ही इथे येऊन बसू आणि दलाली करू असे वाटले होते, पण आमचे पदाधिकारी योग्य काम करत आहेत. मुख्यमंत्री असताना नाशिककडे लक्ष दिले. जास्तीतजास्त जास्त निधी दिला. परिवहन बससेवा सुरू केली
आम्हाला महापालिकेतची सत्ता दलाली खाण्यासाठी नाही.. तर,
आम्हाला महापालिकेतची सत्ता दलाली खाण्यासाठी नाही तर परिवर्तनासाठी हवे आहे, नाशिककरांनी ते परिवर्तन बघितले आहे. नाशिकचे महापौरांनी आय टी हब साठी पुढाकार घेतलाय असेही फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने आडकाठी घातली नाही तर पुढील 3 वर्षात निओ मेट्रो सुरू होईल. यानंतर निर्मल नाशिक बनवायचे आहे, नमामी गंगेच्या धर्तीवर नामामी गोदाप्रकल्प राबविणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले, नदी प्रदूषण मुक्त करण्यासोबतच सर्व बस इलेक्ट्रिक आणि cng ने चालवू परिवहन बससेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 65 लाख नागरिकांनी प्रवास केला. असे फडणवीस यावेळी म्हणाले. कोव्हिडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला. मुंबई पुण्यात सरकारने कोव्हिडं सेंटर काढले. नाशिक महापालिकेने कोव्हिडं सेंटर उभे केले. नाशिककरांना ऑक्सिजन मिळावे म्हणून भाजपचे पदाधिकारी मुंबई मध्ये ठिय्या आंदोलनाला जाऊन बसले. त्यानंतर ऑक्सिजन मिळाले असे सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.
नाशिकची केमेस्ट्री भाजप सोबत
राज्यात सरकार अस्तित्वात आहे की हेच कळत नाही. मुंबईच्या बाहेर राज्य आहे की नाहीं हेच त्यांना कळत नाही. तिन्ही पक्ष एकत्र येऊनही भाजपला पराभूत करू शकत नाही हे त्यांना माहिती असावं म्हणून ते एकमेकांना मदत करतील. नाशिकची केमेस्ट्री भाजप सोबत आहे. नगरसेवकांच्या जागा कमी आहे, भाजपचे तिकीट मिळाले म्हणजे विजय नक्की आहे. म्हणून लोक आपल्याकडे येतात. भाजप ही त्यागाची पार्टी आहे. ज्यांना तिकीट नाही त्यांनी पक्षाचे काम करावे. नेत्यांनी नातेवाईकांना नाहींतर कार्यकर्त्यांना तिकीट द्यावे. आपल्याला तिकीट मिळाले तर पक्ष चांगला नाहीतर वाईट असे म्हणू नका असे सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.
- Nitesh Rane on Shiv sena : महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना, अधिकारी काय पाहणी करणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha