Gautami Patil :  त्या प्रकरणावर काही बोलायचं नाही, माझी मनस्थिती नाही. प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्या विषयावर काही बोलायचं नाही, अशी पहिली प्रतिक्रिया लावणी क्वीन गौतमी पाटील (Gautmi Patil) हिने एका कार्यक्रमात दिली आहे.


नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात रायगड ग्रुप तर्फे लावणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटील पहिल्यांदा माध्यमांसमोर येऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी व्हायरल व्हिडीओ वर बोलणं टाळून 'प्रतिनिधींना दुसरं विचाराना दादा' अस म्हणून बोलण्यास नकार दिला. 


यावेळी त्या म्हणाल्या की, प्रेक्षकांचे खूप चांगला प्रतिसाद महाराष्ट्रात मिळतो आहे. प्रेक्षकांचे प्रेम।मिळत असून ते वाढत असल्याने मला आंनद आहे. व्हायरल विडिओ वर म्हणाल्या की कायदेशीर कारवाई चालू आहे, माझं बोलणं चालू आहे, बर वाटल की माझी दखल घेतली आहे, ताईंनी दखल घेतली, त्यासोबत आहेत, त्यांनी ताबडतोब कारवाई करा अशा सूचना केल्याचे त्या म्हणाल्या. 


गेल्या काही दिवसांत सोशल मीडियासह कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड प्रेम मिळत आहे. गौतमी म्हणाल्या की, प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय, मला नेहमी प्रतिसाद मिळत आला आहे आणि अजून प्रेक्षकांचे प्रेम हे नेहमीच मिळत आले आहे आणि अजून जास्त मिळते आहे, त्याबाबत चांगलं वाटत आहे. अनेक ठिकाणी हुल्लड बाजी केली जाते आहे, प्रेक्षकांना काय सांगाल? माझी मनस्थिती नाही हे असं काही बोलण्याची तरीपण मी मीडिया समोर आली आहे. सोशल मीडियावर गौतमी पाटील कमबॅक असा ट्रेंड होतोय यावर गौतमी पाटील म्हणाले की छान वाटतंय लोक आपल्या सोबत आहेत. याबाबत अभिमान वाटतो आहे. याबाबत चांगले वाटते.


पुण्यात जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला, यावर गौतमी पाटील म्हणाले की त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्याबाबत काही बोलू शकत नाही. पोलिसांकडे काय मागणी करणार या प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाल्या की, काही मागणी करणार नाही, माझ जे काही बोलणं सुरूय, ते चालुय, अधिक काही बोलू शकत नाही. तसेच महिला आयोगाने देखील या प्रकाराची दखल घेतली. यावर गौतमी पाटील म्हणाले की, चांगलं वाटलं, मला तर माहीत नव्हतं की एवढं महिला आयोग वैगरे असत. मला नंतर कळलं की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील दखल घेतली. खूप छान वाटलं, त्या सोबत आहे म्हणून, त्यांनी ताबडतोब संबंधितांवर कारवाई करण्याचा सुचना देखील केल्याचे गौतमी पाटील म्हणाल्या आहेत.


पाहा व्हिडीओ : व्हायरल व्हिडीओवर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया