Dada bhuse : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी उठल्यापासून ते पहाटे पर्यंत काम करत असतात, जनतेची सेवा करत असतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रश्न पडतो, हा माणूस झोपतो कधी? सामान्यांचे प्रश्न सोडवितात,  तुमच्यासारखे रात्रभर काळे काम करत नाही असा खोचक टोला मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांना लगावला आहे. तर मातोश्रीवर जायचं असल्यास कोरोना रिपोर्ट न्यावा लागायचा अशी खंतही भुसे यांनी बोलून दाखवली.


नाशिक शहरातील औरंगाबाद मार्गावर शिंदे सेनेच्या मेळाव्या प्रसंगी दादा भुसे बोलत होते. बिकेसी मैदानावर शिंदे सेनेचा दसरा मेळावा होत असल्याने तत्पूर्वी नाशिकमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भुसे यांनी विरोधकांसह उद्धव ठाकरे यांनी बाण सोडले. ते यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री पहाटेपर्यंत काम करतात राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रश्न पडतो हा माणूस झोपतो कधी? अरे हा माणूस रात्रभर तुमच्यां सारखे काळे काम करत नाही, अशी सणसणीत टीका त्यांनी यावेळी केली.


ते पुढे म्हणाले, दसरा मेळावा भव्यदिव्य करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी झटून काम करा. ग्रामपंचायत पासून लोकसभा सर्व निवडणूक तयारी करायची आहे. शिवसेनेची मोर्चेबांधणी करायची आहे. अडीच तीन महिन्यात धडाकेबाज काम केले आहे. पेट्रोल डिझेल दर कमी करून महागाई कमी केली जात आहे. 3 हेक्टर पर्यत शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सतत पाऊस जरी पडत असेल 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडला तरी मदत दिली जात आहे. तसेच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची दिवाळी साजरी करता येणार असल्याचे ते म्हणाले. 


उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना म्हणाले की, दोन महिन्या पासून एकच कॅसेट लावतात. तर काहींची औकात नाही ते ही बोलताय, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढा. बाळासाहेब ठाकरे कोणा एका व्यक्तीचे बाप नाही, त्यांना संकुचित करू नका. शिवसैनिकांचा बाप काढत आहात. देशाचं बाप शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे बगलबच्चानो तुमच्यात हिंमत असेल तर शिवाजी महाराज यांचे नाव घेणे बंद करा. अनेकजण काही झाले की खोके, गद्दार या शिवाय दुसरा काढत नाहीत. आम्ही गद्दार राहिलो असतो तर एवढे शिवसैनिक आले असते का? आम्ही गद्दार राहिलो असतो तर शिवसेनेचे आमदार खासदार निवडून आले असते का? आमच्यामुळे ज्यांना दिल्ली बघायला मिळाली ते आमचे बाप काढत होते. अडीच वर्षे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी किती शिवसैनिक यांना मंत्रालयात, वर्षावर जात येत होते. आमदार ही भेटू शकत नव्हते. आता रोज भेटी होत आहे. सत्ता गेली आता शिवसैनिक यांना भेटत आहे, त्यानिमित्ताने शिवसैनिक यांना मान मिळतो आहे. आम्ही शिवसेनेत असतांना कधी कधी उध्दव ठाकरे हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असायचे पण आता कोणीतरी नारद मिठाचा खडा टाकायचा, सगळं बिघडायचं, असेही भुसे म्हणाले. 


दादागिरी नही चलेगी!
अनेक लोक शिंदे गटात हेण्यास इच्छुक आहेत. ज्याप्रमाणे नाशिकहून बंटी तिदमे आले. बंटी तिदमे यांनी प्रभागात चांगले काम केले प्रकल्प उभे केले. पण मुंबईचे नेते उद्घाटन करण्यासाठी येई नये यासाठी स्थानिक नेते प्रयत्न करत होते. खच्चीकरण केले जाते होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहेत. काही लोकांना शिंदे गटात येऊ नये म्हणून धमकावले जात आहे. देशात लोकशाही आहे, तिथे कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही


शिवतीर्थावर सोनिया, पवारांचे विचार ऐकायला मिळतील..
उध्दव गटाला शिवतीर्थावर मेळावा करण्याची परवानगी मिळाली मिळू द्या तिथे सोनिया, शरद पवार यांचे विचार ऐकायला मिळतील. फोटो मोदी शहाचे लावले आणि सोनिया यांच्यां पायाशी जाऊन बसले ही गदारी नाही का? 
दादा भुसे यांची चौथी टर्म आहे त्यांच जेवढे वर्ष काम आहे, तेवढे तुमचे वय नाही त्यांना गद्दार म्हणतात. पितृतुल्य व्यक्तीला गद्दार म्हणतात. तुम्हाला मुख्यमंत्री व्ह्याचे होते म्हणून एकनाथ शिंदे यांना बाजूला केले, ही गद्दारी नाही का? दादा भुसे यांची चौथी टर्म आहे, त्यांच जेवढे वर्ष काम आहे. तेवढे तुमचे वय नाही.त्यांना गद्दार म्हणतात असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


मातोश्रीवर जायचे असल्यास.....
कोरोना काळात दोन वर्ष आम्हाला डांबून ठेवले. त्यावेळी अजित पवार मंत्रालयात असायचे मात्र वर्षा रिकामे होते. आम्हला मातोश्रीवर जायचे असेल तर कोरोना रिपोर्ट घेऊन जावे लागायचे. जेव्हा उध्दव ठाकरे वर्षावरून मातोश्रीवर जात होते, तेव्हा कोरोना असून हो लोकांना भेटत होते तेव्हा कोरोना कुठे गेला? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.


आदित्य ठाकरेंवर बरसले...
आदित्य ठाकरेंनी नाव घेऊन बोलावं. नाशिकमध्ये सेनेचे दोनच आमदार मी आणि सुहास कांदे आहेत. आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर भुसे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शिवसेनेमध्ये असे प्रकार चालत नाही. तट अनेक पक्ष बदलून आलेले आम्हाला निष्ठा शिकवत आहेत. राष्ट्रवादीच्या मदतीने आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला गर्दी होत असल्याचे ते म्हणाले.