Nashik Congress News : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Indian National Congress) पक्षाचा गुरुवारी 138 वा स्थापना दिवस आहे. या दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्यावतीने शहराध्यक्ष वसंत ठाकूर (Vasant Thakur) यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा झेंडा तयार करण्यात आला होता. हा झेंडा 8 बाय 138 फूट लांबीचा होता. या झेंड्याची मिरवणूक काढत स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या झेंड्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. 


नाशिक शहर काँग्रेस कमिटीत सकाळी 8:30 वाजता शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या हस्ते पक्ष ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी 9 वाजता सर्वात मोठ्या 138 फूट पक्ष ध्वजाची मिरवणूक काँग्रेस कमिटी येथून सुरू झाली. मिरवणूक मेहेर सिग्नल मार्गे हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून सांगता झाली. मिरवणुकीत मर्दानी खेळ, लेझीम पथक, ढोल पथक सहभागी झाले होते. 


यावेळी माजी मंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री शोभा बच्छाव, नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, शाहू खैरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना


काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. 


पहिले अधिवेशन


सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अखिल भारतीय पातळीवर एका संघटनेची स्थापना करता यावी म्हणून अत्यंत जोमाने तयारी चालविली होती. त्या उद्देशानेच 1883 च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी 'इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 'चे पहिले अधिवेशन बोलविले होते. राष्ट्रभर दौरे करून सरकारच्या धोरणावर प्रखर टीका केली. सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पहिले अधिवेशन मुंबई येथील गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत दुपारी बारा वाजता भरले होते. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, दिनशा वाचा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, के. टी. तेलंग, पी. आनंद चार्ल्, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर आदी मंडळी या अधिवेशनाला उपस्थिती होती. 


आणखी वाचा