Eknath Shinde नाशिक :  राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मान यंदा नाशिकला (Nashik) मिळाला आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते तपोवन येथील मैदानावर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गोंधळ केल्याची घटना घडली आहे. अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Sevika) मानधनात वाढ करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोरच अंगणवाडी सेविकांना टाहो फोडला. मात्र पोलिसांनी (Nashik Police) अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यास मज्जाव केला. त्यामुळे काही महिला सुरक्षेच कड तोडून मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्या. यावेळी पोलिसांना महिलांना ताब्यात घेतले. काही वेळाने त्या महिलांना सोडून देण्यात आले.  


अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय?


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा. वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत. दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात यावे.  मदतनिसांना 20 हजार रुपये मानधन द्या. महागाई दुपटीने वाढते, म्हणून, दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी. सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा.  अंगणवाड्यासाठी मनपा हद्दीत 5 हजार ते 8 हजार भाडे मंजूर करावे. आहाराचा दर बालकांसाठी 16 तर अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा.


अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम


विविध प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाला सुरुवात केली. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Sevika) शिष्टमंडळाची भेट झाली. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंगणवाडी सेविकांमध्ये चर्चा झाली, मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत कोणतेही चांगले पाऊल उचलले गेले नसल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला. 


तसेच, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम असून आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही, आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ कडाडली


तलाठी भरती परीक्षेत ही मुल्यांकनाची प्रक्रिया, कोणतीही अनियमितता नाही, गुणवत्ता यादी याच आठवड्यात होणार जाहीर