नाशिक : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी महाड (Mahad) येथील चवदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) फोटो फाडण्यात आला. यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. आव्हाडांच्या हातून अनवधानाने चूक झाल्याचे भुजबळांनी म्हटले. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भुजबळांवर निशाणा साधला होता. आता भुजबळांनी दरेकरांना उत्तर दिले आहे.   


छगन भुजबळ म्हणाले की, दरेकर काय म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे. आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. जितेंद्र आव्हाड हे विरोधक आहे. त्यांचा विरोध निश्चितच करा. आमचं काही म्हणणं नाही, असे ते म्हणाले. 


मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणारच


मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात नको हे सांगा. मनुस्मृती जाळा, जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. फक्त विरोधासाठी विरोध करू नका. आमची भूमिका फुले, शाहू, आंबेडकरांची आहे. मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणार आहे. त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्याकडून चूक झाली तर आम्ही सांगतो चूक झाली. परंतु ते मुंबईवरून महाडला गेले मात्र त्यांची भूमिका मनुस्मृती तेथे जाऊन जाळणे होती. त्यांचं चुकलं त्यांना शिक्षा करायची ती करा माझे काहीही म्हणणे नाही. पण ज्यावेळी तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल तेव्हा तुम्हाला तो अधिकार येईल, असेही भुजबळांनी म्हटले आहे. 


काय म्हणाले होते प्रवीण दरेकर? 


छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले की, पुरोगामीत्वाचा ढोल बडवणाऱ्या भुजबळांची अशा प्रकारची भुमिका प. पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाजूने सहानुभूती म्हणून व्यक्त करणे दुर्दैवाची आहे. भुजबळांनी अशा प्रकारची भुमिका घेणे योग्य नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांचे श्रद्धास्थान, दैवत आहे. त्यांच्याबाबत असे घडल्यानंतर पुन्हा वरुन पाठराखण करणे ही भुजबळांना काय उपरती झालीय हे कळत नाही, असे त्यांनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


"मला फाशी द्या, फाशी द्या! मनुस्मृतीच्या विरोधात मी उभा राहणार", जितेंद्र आव्हाड गरजले!


Video: शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलवरुनही सुनावले