नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा (Heat) वाढला आहे. वाढत्या उकाड्यामुळे वाहने अचानक पेट घेत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडत आहेत. आता नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway) धावत्या कारला अचानक आग (Fire)लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात चालक बालंबाल बचावला आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway) निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) पिंपळस ते गोंडेगाव फाट्या दरम्यान असणाऱ्या बानगंगा पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतला. 


चालक बालंबाल बचावला 


यात अंदरसूल येथील चालक आकाश राजेंद्र राऊत (24) हा तरुण बालंबाल बचावला.  कारने नेमका कशामुळे पेट घेतला. याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार संपूर्णपणे जळून खाक (Burn) झाली आहे. 


नाशिकमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू


नाशिक शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. अपघाताचा पहिला प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. याबाबत पोलीस शिपाई सचिन रहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सनी बाळू जाधव हे त्यांच्या मोटारसायकलीने पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकवरील चालक सनी भाऊसाहेब सुरासे याने सनी जाधव यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अपघाताचा दुसरा प्रकार लेखानगर येथे घडला. हर्षल प्रदीप सुकेणकर हे मोटारसायकलीने लेखानगरकडून सर्व्हिस रोडने स्टेट बँकेकडे जात होते. त्यावेळी लाईफ केअर हॉस्पिटलजवळ सुकेणकर यांची मोटारसायकल स्लीप झाल्याने ते खाली पडले. त्यांचे वडील प्रदीप सुकेणकर यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Crime : जेवणाची ऑर्डर लवकर देत नाही म्हणून हवेत गोळीबार, नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत चौघांना बेड्या


Mumbai Goa Highway Accident : जगबुडी पूल आणि भोस्ते घाट ठरतोय अपघातांचा ब्लॅक स्पॉट; एकाच रात्री दोन भीषण अपघात, दोन जण गंभीर