Nashik Udayanraje Bhosle : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrpati Shiwaji Maharaj), संभाजी महाराज यासह इतर महापुरुषांनी देशासाठी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. त्यांनी जे विचार मांडले, त्यांची उंची सुद्धा आपण गाठू शकत नाही, मात्र आजच्या घडीला जातीं जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरु असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी व्यक्त केले. 


नाशिकमध्ये (Nashik) भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु असून या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना समाजात वाढत असलेल्या विकृतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की समाजात अशा प्रकारची विकृती आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. त्यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 


आजच्या भाजप कार्यकारिणीच्या (BJP Meet) बैठकीत मान्यवरांनी जे मुद्दे मांडले ते सर्व लोकहिताचे असून सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग असेल, मग अपेक्षित वर्ग असेल या सर्वांना स्पर्श करणारे असे सगळे मुद्दे मांडयताले. भारतीय जनता पार्टीचे सर्व देश पातळीचे, राज्य पातळीचे नेते काम करत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. लोकांना आज पर्यंत दिलासा मिळाला नाही, या सर्वांचे प्रेरणेतून नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा उदयनराजेंनी बोलून दाखवली. 


उदयनराजे पुढे म्हणाले कि, सध्या विरोधक नुसते आरोप करत आहेत, विरोधकांचे सर्व मुद्दे संपलेले आहेत. जो काम करतो त्याला ठेचा लागतात. जे काम करत नाही, बोलणं हेच त्यांचं काम असते. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला कसे मिळेल असा विकृत विचार समाजात रूढ होत चालला आहे, पण आजचे लोक सुज्ञ असून लोक विचार करतात, हे राजकारण्यांनी ध्यानात घेतले पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे द्यायला विसरले नाही.


समाजात विकृती वाढते आहे... 


महापुरुषांना कमी लेखण्याची विकृती समाजात आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.