Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत (Mahayuti Seat Sharing) तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच (Shiv sena) मिळणार असा दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) तिकीट मिळण्याचे संकेत आहे. यामुळे महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
आता नाशिक लोकसभेची जागा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक लोकसभेची जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील, असेही समजते.
सुनील तटकरे उद्या छगन भुजबळांच्या नावाची घोषणा करणार?
उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे उमेदवारी जाहीर करण्यास आत्तापर्यंत उशीर होत असल्याचे समजते. मात्र आता अधिकचा वेळ न दवडता उद्याच राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करून टाकणार अशी माहिती मिळत आहे.
नाशिकची जागा आमचीच, शिवसेनेचा दावा
तर दुसरीकडे शिवसेना नाशिकच्या जागेसाठी कमालीची आग्रही आहे. कारण नाशिकमधून हेमंत गोडसे हे सलग दोन वेळेस खासदार झाले आहेत. त्यामुळे नाशिकही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे, नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला आहे. महायुतीत नाशिक लोकसभेच्या रस्सीखेचीत नक्की कुणाला जागा सुटणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
भुजबळांविरोधात सकल मराठा समाज आक्रमक
दरम्यान, छगन भुजबळांना नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास मराठा समाजाकडून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असून भाजप म्हणते आम्ही सर्व्हेवर चालतो, मात्र एकही माणूस म्हणणार नाही की, भुजबळ यांना उमेदवारी द्या, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला, तब्बल तासभर चर्चा; युतीची काय चर्चा झाली?