नाशिक: नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक (Nashik News) कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या नाईक संदीप सिंह यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने आपल्या मोबाईल फोनवरून आयएसआयला महत्त्वाची लष्करी माहिती पुरवली, यावरून हे हेरगिरीचे प्रमाण समोर आले आहे. आरोपीकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत, ज्याचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे. काल (शनिवारी, ता- 8) दुपारी पत्रकार परिषद घेऊन एसएसपी चरणजित सिंह सोहल आणि एसपी हरिंदर सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपी संदीप सिंहने सैन्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती विकली आहे. या कामासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जवळपास पंधरा लाख रूपये मिळाले आहेत.(Nashik News)
नेमकं काय घडलं?
संदीप सिंह 2015 मध्ये सैन्यात भरती झाला होता आणि त्याने सैन्याच्या गुप्त माहितीची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप सिंहने आयएसआयला लष्कराच्या तैनाती, छावण्यांच्या ठिकाणांची माहिती आणि शस्त्रास्त्रांची फोटो सोशल मिडिया व्हॉट्सअॅपवरून पाठवली होती, अशी माहिती पोलिसांनी तपासात उघड झाली आहे. त्याचबरोबर आरोपीने यासाठी 15 लाख रुपये घेतले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.(Nashik News)
15 लाख रुपये घेतले
संदीप सिंह कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी त्याच्या तीन मोबाईल फोन्सचे तपासणी सुरू केली आहे. संदीप सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लष्कराच्या गुप्त माहितीला पाकिस्तानपर्यंत पोचवले होते. आरोपीला पटियाला येथून अटक करण्यात आली, जिथे तो रजेवर गेला होता. पोलिसांनी त्याला तिथे ताब्यात घेतले. यापूर्वी नाशिक कॅन्टोन्मेंटमधील एका कॉन्स्टेबल अमृतपाल सिंहला देखील अटक केली होती. त्याने आयएसआयच्या सूचनेनुसार एक निर्जन ठिकाणी २ लाख रुपये घेतले होते. मागील दोन वर्षांत संदीप सिंहने नाशिक, जम्मू, पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांचे फोटो, शस्त्रास्त्रांची माहिती आणि अधिकाऱ्यांच्या तैनातीची माहिती आयएसआयला पाठवली होती, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. यासाठी 15 लाख रुपये घेतले होते, अशी देखील माहिती आहे.(Nashik News)
आरोपी काही दिवसांपूर्वी रजेवर गेला अन्...
आरोपी काही दिवसांपूर्वी रजेवर गेला, तो सुट्टीत पटियालाला गेला होता. संधी मिळताच घरिंडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला पटियाला येथून अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने अनेक खुलासे केले आहेत.