मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे Shiv Sena deputy leader Advay Hire यांना अखेर मुंबई हायकोर्टानं (Bombay High Court) जामीन मंजूर केल्यानंतर आज (14 ऑगस्ट) मध्यवर्ती कारागृहातून सूटका होणार आहे. ऐन निवडणुकीच्या (Maharashtra Election) तोंडावर अद्वय हिरे यांना जामीन मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मालेगावमधील रेणूका देवी सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली होती. नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी मालेगावातील रमजानपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्वय हिरे यांना 15 नोव्हेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा पोलिस कोठडीनंतर 23 नोव्हेंबर 2023 पासून हिरे न्यायालयीन कोठडीत होते.
अद्वय हिरे आणि दादा भुसे यांच्यांत सामना रंगणार?
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांना शह देण्यासाठी अद्वय हिरे यांना उपनेतेपदी संधी दिली. आता अद्वय हिरे यांची जामीनावर सूटका झाल्याने ते मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे अद्वय हिरे आणि दादा भुसे यांच्यांत विधानसभेचा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हिरे यांच्या कुटुंबाचा दबदबा कायम राहिलेला आहे. अद्वय हिरे यांनी 27 जानेवारी 2023 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंकडून अद्वय हिरे यांना बळ दिलं जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या