North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या मिळवा एका क्लिकवर...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अनिरुद्ध जोशी Last Updated: 27 Jan 2024 05:20 PM
Nashik Crime News : शहरात पुन्हा तीन घरफोड्या

शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या (Robbery) घटनांमध्ये वाढ होत आहे. घरफोडी रोखणे नाशिक पोलिसांपुढे (Nashik Police) मोठे आव्हान असून पुन्हा एकदा शहरात तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात चोरांनी सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यात दोन घरफोड्या भरदिवसा झालेल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा, सातपूर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Dilip Walse Patil : भुजबळांच्या भूमिकेवर वळसे पाटलांनी बोलणं टाळलं

मराठा समाजाच्या मागण्याच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक होते. या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल. भुजबळ साहेब काय म्हणाले ते मला माहिती नाही. त्यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यामुळे मला बोलता येणार नाही, असे म्हणत भुजबळांच्या भूमिकेवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलणे टाळले.

Eknath Khadse : सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, एकनाथ खडसेंचा दावा

मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य झाल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  शासनाने जो जीआर काढला आहे. तो जीआर म्हणजे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावर नाराजीनंतर छगन भुजबळांचा मोठा निर्णय

मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची (Maratha Reservation) लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला. हा अध्यादेश नाही ड्राफ्ट आहे, नोटिफिकेशनचा मसुदा आहे. 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भुजबळांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nashik Crime News : जबरी चोरी करणारे दोन सराईत पोलिसांच्या ताब्यात

जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अंबड पोलिसांना मोठे यश आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 35  हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल फोन व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.