Nandurbar Weather Update : राज्यातील अनेक भागात थंडीने (Cold) कहर केला असून यातून सातपुडा पर्वतरांग (Satpuda Mountain) परिसरही सुटलेला नाही. आज सातपुडा डोंगररांग परिसरात तापमान घसरलं असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे गवतावर बर्फाचा थर पाहायला मिळत असून तापमान (Temperature) घसरल्याने दवबिंदू गोठले आहेत. 


नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील वालंबा, डाब आणि तोरणमाळ (Toranmal) परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने थेट दवबिंदू गोठल्याचा प्रकार समोर आला आहे. दवबिंदू गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसुन आले. गेल्या काही वर्षापासून या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदू गोठून बर्फाची चादर पांघरल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या भागात हवामान विभागाचे कुठलेही तापमान मापक यंत्र नसल्याने नेमक तापमान किती याबाबत नोंदच होत नाही. अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. 


नंदुरबार जिल्ह्यातील सापतुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या वालंबा, डाब परिसरात दवबिंदू गोठले आहे. राज्यातील क्रमांक 2 चे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये देखील अशीच परिस्थिती असून कडाक्याच्या थंडीने दवबिंदू गोठल्याने गवतांवर बर्फाच्छादीत चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात तापमाना घट झाल्यामुळे सातत्याने दवबिंदू गोठण्याचे प्रकार समोर येत आहे. मात्र अतिदुर्गम भागात तापमान मापक यंत्रच नसल्याने तापमानाचा पारा किती अंशापर्यत गेला याबाबत माहिती नाही. नंदुरबार जिल्ह्यातील सपाटी भागात तापमानाचा पारा दहा अंशापर्यत गेला असून गेल्या 48 तासात किंमान तापमानात 8 अंश सेल्सिअसने घट झाल्याचे चित्र आहे. 


गेल्या काही वर्षापासून या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मात्र या भागात हवामान विभागाचे कुठलेही तापमान मापक यंत्र नाही. अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. गेल्या 48 तासात नंदुरबार मधल्या सपाटी भागतच तापमानात 8 अंश सेल्सिअस पर्यत घट झाली आहे. सातपुड्याच्या पर्वत रागांमध्ये सपाटीभागापेक्षा तापमाना चार ते पाच अंशानी कमी असते.