Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेडा घोडे बाजारात (Sarangkheda Horse Market) एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले ते घोडा आणि बुलेट मोटरसायकल यांच्यात घेतलेल्या थरारक शर्यतीचे (Horse Vs Bullet Race). गर्दीने खचाखच भरलेल्या पटांगणात ही अनोखी रेस पाहण्यासाठी हजारो अश्वशौकीनांची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली.

Continues below advertisement

शर्यत सुरू होताच अश्व प्रेमींनी प्रचंड जल्लोष झाला. एका बाजूला इंजिनचा गडगडाट आणि दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या घोड्यांची धमक, अशा वातावरणात ही रोमांचक रेस पार पडली. शेवटी घोड्यांनी आपला नैसर्गिक वेग आणि दमदार ताकद दाखवत बुलेटला मागे टाकत बाजी मारली.

Sarangkheda Horse Vs Bullet Race: ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी

वेगाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोड्यांनी या रेसमध्ये पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांचा वेग कोणत्याही यंत्रमानवावर भारी आहे. या शर्यतीत मध्यप्रदेशातील महेश्वर येथील यादव स्टड फार्मची ‘वेगवान राणी’ नावाची घोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या घोडीने बुलेटसोबत रेसिंग ट्रॅकवर दमदार स्पर्धा देत शर्यतीत विशेष कामगिरी केली.

Continues below advertisement

Sarangkheda Horse Vs Bullet Race: घोडा vs बुलेट शर्यतीचे विशेष आकर्षण

घोडे बाजारात आधीच भरगच्च गर्दी होती. त्यातच रेस पाहण्यासाठी अश्वशौकीन, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठी उत्सुकता दिसून आली. घोड्याचा वेग प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी म्हणून अनेकांनी रेस करण्याची मागणी आयोजकांकडे केली. अखेर आयोजकांनी परवानगी दिल्यावर घोडा–बुलेट शर्यतीची ‘फॅन क्रेझ’ अक्षरशः उसळली. रेस सुरू होताच मैदानात जल्लोष, शिट्ट्या, टाळ्या असा उत्साह ओसंडून वाहू लागला. घोड्यांच्या नैसर्गिक वेगाच्या आणि पराक्रमाच्या प्रदर्शनामुळे ही शर्यत सारंगखेडा घोडे बाजारातील यंदाच्या सत्रातील हायलाइट ठरली.

Sarangkheda Horse Market: चेतक फेस्टिवलमध्ये 50 हजारापासून तर 11 करोडपर्यंतचे घोडे

दरम्यान, सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जात आहे. या घोडे बाजारातून दरवर्षी शंभर कोटीची उलाढाल होत असते, यामुळे चेतक फेस्टिवल महाराष्ट्रातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून प्रसिद्ध होत आहे. सारंगखेडाच्या यात्रेत सर्व प्रकारचे घोडे येत असतात. यात प्रामुख्याने घोड्यांच्या स्पर्धा होत असतात. घोडा हा शुभ लक्षण आहे, यामुळे अनेक शौकीन आपल्या घरासमोर घोडा ठेवत असतात तर आणि घोडे अश्वसंयोगाच्या व्यवसाय देखील होत असतो. या चेतक फेस्टिवलमध्ये 50 हजारापासून तर 11 करोडपर्यंतचे घोडे येत असतात. यामुळे ही यात्रा अश्वशौकीनांसाठी एक पर्वणीच असते.

आणखी वाचा 

Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात