नंदुरबार : नंदुरबार  जिल्ह्यातील मोलगी अक्कलकुवा मार्गावरील देवगोई घाटात एक स्कूल बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिकांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरु करण्यात आल्याची देखील माहिती आहे. 

Continues below advertisement

Nandurbar School Bus Accident :  अपघात कुठं घडला?

 अक्कलकुवा मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात स्कूल बसच्या भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. ही बस मोलगीकडून अक्कलकुवा कडे येत होती.  विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळं घडला हे देखील समोर आलेलं नाही. 

अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती

नंदुरबारमधील या बस अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. खोल दरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.अपघात ग्रस्त स्कूल बस मध्ये अंदाजे 30 ते 35 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

 मोलगी गावाहून अक्कलकुवाच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना आमलिबारी परिसरात हा अपघात झाला आहे. शंभर ते दीडशे फूट खोल दरीत बस कोसळल्याने बस हा अपघात झाला आहे. जखमींना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत बचाव कार्य सुरु केलं. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. या बस अपघातात 30 ते  35 मुलं बसमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. बस खोल दरीत गेल्यानं किती मुलं अडकली आहेत याचा अंदाज येत नाही. अक्कलकुवा, धडगाव, कुळगाव या ठिकाणच्या रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत.

अपघातग्रस्त बस अनुदानित आश्रम शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थ्यांनाघेऊन देवगोई घाटातून बस परतत असताना अघात झाला. बस खाली दाबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू  झाल्याची माहिती आहे. हे विद्यार्थी  जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अनुदानित आश्रम शाळेच्या दोन बस आज दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात यातील एका बसचा अपघात झाला.जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.