नंदुरबार: देशासह राज्यात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, मात्र दुसरीकडे नॉयलॉन मांजाच्या (Nylon manja) वापरामुळे अनेक नागरिक जखमी झाले. तर प्राणी, पक्षांना आपला जीव गमवावा लागला. पतंगोत्सव उत्साहात साजरा होत असताना नायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह माणसांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी नंदुरबारातील युसूफ खान यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात फिरून तब्बल 100 किलो मांजा गोळा केला. फक्त गोळा केला नाही तर तो नष्ट देखील केला आहे. केवळ यंदाच नाही तर ते गेल्या 15 वर्षांपासून मांजा गोळा करून सामाजिक दायित्व निभावत आहेत.
संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. साजऱ्या केल्या जाणाऱ्या पतंगोत्सवात कापलेल्या पतंगांचा मांजा रस्त्यावर पडतो किंवा झाडाझुडपांमध्ये अडकतो. अर्धवट राहिलेल्या मांजामुळे अनेक पक्षी आणि नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नंदुरबार शहरातील पानटपरी चालक असलेल्या युसुफभाईंच्या मनावर परिणाम करून गेली. मांजामुळे जखमी झालेल्या पक्षाच्या यातना सहन न झाल्याने त्यांनी संक्रांतीनंतर पाच दिवस आपला व्यवसाय सोडून मांजा गोळा करतात आणि तो नष्ट करण्याचे काम करतात.
नंदुरबर जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र या काळात पतंग कापल्यानंतर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा झाडावर अडकतो किंवा रस्त्याचाकडेला जाऊन पडतो. त्यामुळे रस्त्याने जाणारे येणाऱ्या जखमी झाले आहेत. 15 वर्षापूर्वी युसुफ भाईने जखमी पक्षी पहिला आणि मांजामुळे झालेल्या आपघातात जखमी झालेले नागरिक पाहिले आणि त्या दिवसापासून त्यांनी संकल्प केला. संक्रांतीनंतर पाच दिवस शहरातील कानाकोपऱ्यात फिरून मांजा गोळा करतात आणि नष्ट करतात. सरकारने नायलॉन मांजा आणि त्यासोबत इतर घातक मांज्यांवर बंदी घातलेली असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात. मांजा सापडतोच कसा असा सवाल युसूफभाई उपस्थित करतात. संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शंभर किलो मांजा गोळा करून नष्ट केला आहे. सरकारने पर्यावरणाला घातक असलेल्या मांजा निर्मितीवरच बंदी घालावी अशी मागणी युसुफ भाई करतात.
एखादी घटना मानवी मनावर इतकी परिणाम करून जाते की, त्यातून एक मोठं काम उभे राहते. नंदुरबारच्या युसुफ भाईच्या संदर्भात पान टपरी चालक असलेल्या युसुफ भाई पर्यावरणपूरक काम करत असताना पाच दिवस आपला व्यवसाय बंद ठेवत हे कार्य करत असतात. एखाद्या चांगल्या कामात आर्थिक परिस्थिती आड येत नसल्याचे त्यांनी दाखवून दिलं आहे.
संबंधित बातम्या :