Uddhav Thackeray Shiv Sena city chief Niradhar Jadhav, यवतमाळ : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख निराधार जाधव (Niradhar Jadhav) यांनी आयुष्य संपवलंय. शिवसेना शहर प्रमुखांनी (Uddhav Thackeray Shiv Sena city chief) आत्महत्या केली असून त्यांचा मृतदेह महागाव शिवारातील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शहरप्रमुखांनी आयुष्य संपवल्यानंतर संपूर्ण तालुक्यात ह ळहळ
अधिकची माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील माहूरचे शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख निराधार जाधव यांनी आनंदवाडी शिवारातील जंगल भागात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे महागाव परिसरात सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवल्यानंतर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. निराधार जाधव यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पुढील तपास महागाव पोलीस करत आहेत. निराधार जाधव हे माहूरला राहत होते आणि ते शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत.
निराधार जाधव यांनी अनंतवाडी शिवारातील जंगलभागात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महागाव तालुक्यातील अनंतवाडी शिवारात वनमजूर 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान, जंगल भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना शिवसेना शहर प्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजले. त्यांनी याची माहिती गावच्या पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या