नांदेड : हिंगोली (Hingoli) येथील सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उत्तर दिलं होतं. दरम्यान आता शेलार यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांचा अस्तित्व मर्यादित केले असून, त्याकडे शेलारांनी आधी लक्ष द्यावं," असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. नांदेड दौऱ्यावर असताना सुषमा अंधारे या माध्यमांशी बोलत होत्या.


उद्धव ठाकरेंची अवस्था शोले मधल्या असराणी सारखी झालीय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादित राहावे, असा इशारा भाजपाचे आशिष शेलार यांनी दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांच्यावर टीका केलीय. फडवणीसांनी शेलारांचे अस्तित्व किती मर्यादित केले ते आधी त्यांनी पाहावे असा टोला अंधारे यांनी शेलार यांना लगावलाय. तर कानामागून आलेले किती लोकं तिखट झाले. प्रवीण दरेकर, मोहित कंबोज, प्रसाद लाड यांना त्यांच्या कक्षा वाढवून दिल्या असून, शेलार मात्र मर्यादित राहिले आहे. त्यामुळे शेलार यांनी याचा चिंतन करावं असे अंधारे म्हणाल्यात.


दरम्यान बीड येथील अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली होती. तसेच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर तेलगी प्रक्रणारत गंभीर आरोप केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच बोलायला हवे असे मत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.


दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर सरकार उदासीन


राज्यातील सरकार गंभीर आहे की नाही हे आपल्याला कळत आहे. एकीकडे दुष्काळग्रस्तांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी पैसा नाही. पिक विम्याचा प्रश्न गंभीर आहे. दुबार पेरणीचं संकट उभं आहे. यासाठी लागणारा पैसा तिथे खर्च करण्याऐवजी शासन आपल्या दारी असं म्हणत एकच कार्यक्रम चार-चार वेळी रद्द केलं जात आहे. यासाठी लोकांच्या कष्टाचा पैसा उधळला जात असून, यावर सरकार किती गंभीर आहे हे दिसून येत असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.


काय म्हणाले होते आशिष शेलार? 


उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केल्यावर आशिष शेलार यांच्याकडून त्यांना उत्तर देण्यात आले होते. "उद्धव ठाकरेंना आमचे नम्रपणे सांगणे असून, मर्यादा ठेवा, मर्यादा पाळा आणि मर्यादित राहावे. तर उद्धव ठाकरे यांची अवस्था शोळे चित्रपटातील असराणी सारखी झाली आहे. 'आधे इधर आधे उधर और मै कडक जेलर' अशी अवस्था त्यांची असल्याचं शेलार म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Uddhav Thackeray : माझ्या वडिलांचं नाव वापरता?, दिल्लीतील वडिलांमध्ये हिंमत नाही का?; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा