NIA Raid: आयसिस वरून संपूर्ण देशभरात एनआयएचे छापे मारल्या जात आहेत. त्यातच देशभरातील एकूण 6 राज्यात, 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात महाराष्ट्रातील नादेडच नाव समोर आले आहे. नांदेड शहरातील इतवारा परिसरातील जुनागंज मस्जिद येथील मुफ्ती व इतर दोन जनांना संशयित म्हणून NIA ने छापेमारी करत ताब्यात घेतलेय. 


या प्रकरणात आज सकाळी साडेतीन वाजता  NIA ने नांदेड शहरातील इतवारा परिसरातील परिसरातील एक जन व देगलूर नाका खुदबेह नगर येथील दोन जणांना ताब्यात घेतलेय. सदर व्यक्ति या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचा संशय NIA ला होता. ज्यात अधिक माहिती अशी की, एनआयए ने नांदेड येथील इतवारा परिसरात राहणाऱ्या एका विशिष्ट धर्मातील मुफ्ती यांना ईतवारा भागातून ताब्यात घेण्यात आलेय. तर त्यांच्याकडे काही संशयास्पद कादपत्रे आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. तर देगलूर नाका परिसरातील खुदबेह नगर येथील दोन युवकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. जे मोबाईल चोर असल्याची माहिती मिळतेय. 


दरम्यान मुफ्तीसह दोन मोबाईल चोर हे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यानुसार तीन जणांना सकाळी नांदेड शहरातील विविध भागातून NIA ने ताब्यात घेतले होते. तर इतर एक जाणास दुपारी 3 वाजता ताब्यात घेण्यात आले असून आता संशयितांची संख्या चार झाली आहे. दरम्यान नांदेड येथील एटीएस कार्यालयात सकाळी 7 वाजता डोक्यात काळे कपडे टाकून या चार जणांना आणण्यात आले असून त्यांची सध्या NIA कडून कसून चौकशी सुरू आहे. याविषयी NIA च्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. एनआयएने मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. ज्यामध्ये दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


What is ISIS module : संपूर्ण देशाला विळखा घातलेलं ISIS मॉड्यूल आहे, तरी काय ?
ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई