Ashok Chavan on Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पक्षाशी बंडखोरी करुन उमेदवारी दाखल करणं गंभीर असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता. जर मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती. पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणं ही गंभीर बाब असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


Balasaheb Thorat : अधिक माहिती बाळासाहेब थोरात यांना असू शकते 


मूळ उमेदवार हे सुधीर तांबे असताना त्यांनी नामांकन पत्र भरले नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं सत्यजीत तांबेचं हे प्रकरण गंभीर आहे. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता. जर मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती, पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणे  गंभीर असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. या प्रकरणातील अधिक माहिती बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना असू शकते. याविषयी पक्षश्रेष्ठींनी दखल घेणं गरजेचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 


पक्षानं गंभीर दखल घ्यावी


दरम्यान, वास्तुस्थिती समजून हे घडण्यामागचं कारणं काय आहेत हे समजून घेणं गरजेचे आहे. अशा घटनांवर पक्षानं गंभीर दखल घ्यावी असेही अशोक चव्हाण म्हणाले. या घटनेमुळं पक्षाला एक जागा गमवावी लागत आहे. काल जे काही घडलं त्यामध्ये पक्षाचे नुकसान आहे. यावर कोणी बोलू किंवा न बोलू जे घडलं आहे ते समोर आहे. त्यामुळं यातील सत्यता तपासावी लागेल असे चव्हाण म्हणाले.   


नाना पटोलेंचीही टीका 


सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेस सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.   


महत्त्वाच्या बातम्या:


Nana Patole : सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही; नाना पटोलेंनी थेटच सांगितलं