Nanded ZP News Updates: नांदेड जिल्ह्यातील मुखेड (Nanded Mukhed News) येथील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषद नांदेडकडून चौकशी लावण्यात आली होती. दरम्यान मुखेड तालुक्यातील (Mukhed Taluka) दोन ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करू नये या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेकडून (Gramsevak Sanghtna) आंदोलन करण्यात आले होते. ज्यात आंदोलन करणाऱ्या 40 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामसेवकांनी या निलंबन कारवाईच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली असून ही समिती आज अहवाल देणार आहे. दरम्यान या चौकशी समितीसमोर ग्रामसेवकांना आदेश देण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर कारवाई होत नसल्याने त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला होता. त्यानंतर ठोंबरे यांनी 40 जणांच्या निलंबनाचे आदेश काढले. या निलंबनावरून ग्रामसेवक संघटनेमध्ये त्याचे पडसाद उमटले. दुसऱ्याच दिवशी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर ठोंबरे यांनी आपण दबावात ही कारवाई केली असून शासनाकडे आपणास कार्यमुक्त करावे असे पत्र नांदेड जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिले आहे, असं सांगितलं होतं.
त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठित केलीय. तर दुसरीकडे मनसेनेही निलंबन मागे घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच आंदोलनात 40 नसून 60 ग्रामसेवकांचा सहभाग होता, असा दावा मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी केला आहे. तर ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलन काळात ग्रामसेवकांना मिळणाऱ्या वेतनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय.
एकूणच या सर्व गोंधळात आज चौकशी समितीचा अहवाल येणार आहे. तरी ग्रामसेवक मात्र अद्यापपर्यंत या चौकशी समितीसमोर हजर झालेले नाही. हा अहवाल कुणाच्याही बाजूने आला तरी गदारोळ होणार हे मात्र नक्की आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून निलंबनाच्या विषयावरुन बराच गदारोळ सुरु आहे. आज चौकशी समितीच्या अहवाल आल्यानंतर त्याचे पडसादही उमटणार आहेत. त्यात ग्रामसेवक, जिल्हा परिषद आणि मनसे नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी देखील वाचा