Nanded Rain Yellow Alert : गेल्या तीन दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळत असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गावात पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अशात आता आणखी चार दिवसांसाठी नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने यांनी आज (22) रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आजच्या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट देण्यात आला आहे. तर 23 जुलै ते 26 जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी (22 जुलै) रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच 23 ते 26 जुलै ह्या चार दिवसात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार...


गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पुर आले आहे. तर शेतात देखील पाणी तुंबले आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुक्यात पैनगंगा नदीला पुर आला आहे. तर टाकळी या गावात पुराच्या पाण्यात एकाच कुटुंबातील तीन जण अडकले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न सुरु होते. तसेच मांडवी हद्दीमध्ये पैनगंगा नदीचे पाणी पुलाला लागल्याने आणि पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे मांडवी, उनकेश्वर व विदर्भात जाणाऱ्या पारवा, घाटंजी रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली होती. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


दिवसभर होती अशी परिस्थिती...


तर नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केल असून, धबधब्याचा हा रुद्र अवतार पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलीय. दरम्यान या पुराच्या स्थितीत धबधब्याकडे जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलय. तसेच पैनगंगा नदीला पूर आला आल्याने माहूर जवळच्या धनोडा इथल्या पुलावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत. त्यामुळे माहूर- धनोडा रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आलीय. याच ठिकाणी टाकळी गावाच्या शिवारात काल सांयकाळपासून तिघे जण अडकलेले आहेत. त्या तिघांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू झाले असून, घटनास्थळी एसडीआरएफचे पथक पोहोचले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: