Continues below advertisement


नांदेड : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या (Accident) सख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. अनेकदा वाहनांची गती, ड्रंक अँड ड्राईव्ह, तसेच ओव्हरटेक हेच अपघाताचे मूळ कारण असते. तर, काही वेळा खराब रस्त्यांमुळेही अपघाताच्या घटना घडता. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड शहरात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघाताची घटना घडली. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. गंभीर जखमींना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.


मुखेड शहरातील बाराहाळी नाका येथे भीषण अपघाताची घटना घडला. भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ​स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेली ही धडक इतकी भीषण होती की जीप जागेवरच पलटी झाली. याशिवाय, ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 ते 6 मोटरसायकललाही चिरडले. त्यामुळे, या विचत्र अपघातात दुचाकीसह तेथे रस्त्यावर असणारे 7 ते 8 जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.


दरम्यान, ​या अपघातामुळे बाराहाळी नाका परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा


बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये