Continues below advertisement

नांदेड : स्वतःच्या मुलाप्रती आईची भावना काय असते ते कुणीही शब्दात सांगू शकत नाही. आई आपल्या तान्ह्या मुलावरही तितकेच प्रेम करते आणि ती म्हातारी जरी झाली तरी तिच्या मुलावरही तितकेच प्रेम करते. आई आणि मुलाच्या प्रेमाला वयाचे बंधन नसते असं म्हणतात. नेमकी ती भावना दर्शनवणारी पण एक दुर्दैवी घटना नांदेडमध्ये घडली. पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर विरह सहन न झाल्याने आईला जबर धक्का बसला आणि याच विरहाने व्याकुळ झालेल्या आईनेही अवघ्या तीन तासांतच प्राण सोडला. मनाला चटका लावणारी घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मौजे उमाटवाडी (वाडी मुक्ताची) येथे घडली.

पुंडलिक पुरभाजी देशमुख ( वय 60) आणि सुलोचनाबाई पुरभाजी देशमुख (वय 80) अस मृत मुलाचं आणि आईच नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान माय लेकाला एकाच चितेवर अग्नी देण्यात आली.

Continues below advertisement

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मौजे उमाटवाडी (वाडी मुक्ताची) येथील पुंडलिक देशमुख यांना कॅन्सर आजार होता. गेल्या एक वर्षापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांशी ते झुंज देत होते. अखेर सोमवार, 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मुलाच्या निधनचा धक्का आईला बसला. मुलगा सोडून गेल्याने मुलाच्या पार्थिवाजवळ बसलेल्या आईला दुःख सहन झाल नाही आणि अवघ्या तीन तासांतच सुलोचनाबाई देशमुख यांनी प्राण सोडला. मुलाच्या अंतविधीला जमा झालेल्या नातेवाईक आणि गावकऱ्यांवर दोघांची एकाच वेळी अंतविधी करण्याची वेळ आली. दोघांच्याही पार्थिवावर सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात उमाटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाच डोंगर कोसळला आहे.

एकाच चितेवर दोघांना अग्नी

मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच शोकाने व्याकुळ झालेल्या 80 वर्षीय माता सुलोचनाबाई देशमुख यांनी ही प्राणत्याग केला. घटनेनंतर नातेवाईकांनी दोघांच्या अंत्यविधीची तयारी केली. दोघांना ही एकाच चितेवर अग्नी देण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार आई आणि मुलाला एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

ही बातमी वाचा: