नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर खरबी फाटा येथे सोमवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. भागवत श्यामसुंदर शिंदे (रा. जानापुरी) असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

भागवत शिंदे हा दुचाकीवरून घराकडे जात होता. खरबी फाट्यावरून जानापुरीकडे वळताना तो रस्ता ओलांडत असताना नांदेडकडून लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की भागवतचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव ट्रकची जोरदार धडक (Highway Accident Nanded-Latur)

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र गंभीर दुखापतीमुळे भागवतची प्राणज्योत मालवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

Continues below advertisement

दहावीच्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक स्वप्न अपुरे (Class 10 Student Death)

सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून भागवतही परीक्षेला बसला होता. परीक्षा काळातच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने त्याचे शैक्षणिक स्वप्न अपुरे राहिले. एका उमद्या विद्यार्थ्याच्या अकाली निधनाने जानापुरी गावावर आणि त्याच्या शाळेत शोककळा पसरली आहे.

पोलिसांची कारवाई सुरू (Police Investigation Sonkhed)

घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढील तपास सुरू असून अपघाताची नेमकी कारणे शोधली जात आहेत.

ही बातमी वाचा: