नांदेड : जिल्ह्यातील किनवट तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. आधी पत्नीची हत्या (murder) करून नंतर स्वतः गळफास घेऊन एकाने आत्महत्या (suicide) केली. राहत्या घरात पत्नीची हत्या करून पत्तीनेच लायलोन दोरीने गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. आज (20 सप्टेबर)  रोजी सकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एकाचवेळी पती-पत्नीची मृतदेह आढळून आल्याने पपरिसरात मात्र खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रूपाली मारुती भालेराव (29 वर्ष रा. भिसी, किनवट) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून, मारोती विठ्ठल भालेराव (वय 35 वर्ष, रा.भिसी, किनवट) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. 


रूपाली आणि मारोती यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान, सर्व काही सुरळीत सुरु असतानाच आज सकाळी साडेआठच्या सुमारास रूपाली आणि मारोती यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. दरम्यान, याची माहिती मिळताच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश भोसले यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी त्यांनी पाहणी केली असता 29 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह लाकडी पलंगावर आढळला. तर पतीचा मृतदेह लायलोन दोरीने गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे आधी पत्नीची हत्या करून, करून त्यानंतर पतीने हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनेचा पंचनाम केला असून, पुढील तपास करण्यात येत आहे. 


पत्नीची हत्या करून स्वतः मारोती यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समजू शकले नाही. मात्र, या दुहेरी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर, या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपास केला जात आहे. इस्लापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. मात्र, सर्व काही सुरळीत सुरु असतानाच मारोती यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अजूनही समोर आले नाही. 


पोलिसांकडून तपास सुरु... 


किनवट तालुक्यातील भिसी येथे राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आधी पत्नीची हत्या करून पतीने देखील आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर देखील तपासाचे आव्हान असणार आहे. मारुती भालेराव याने आपल्या पत्नीची हत्या का केली? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मारोती यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवारातील सदस्यांकडून मारुती यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचे काम पोलीस करत आहे. त्यामुळे या दोन्ही हत्या आणि आत्महत्याचे कारण पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded Crime : पहाटे झोपेत असलेल्या गरोदर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या, आरोपी पती पोलिस ठाण्यात हजर