Nanded Crime News: नांदेडच्या लोहा तालुक्यातील खेडकरवाडी गावात एका धक्कादायक घटना समोर आली असून, दोन सख्ख्या भावांनी मिळून जन्मदात्या पित्याचा निर्दयपणे हत्या केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही भावांना अटक केली आहे. तर याप्रकरणी माळाकोळी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन हावगी कल्याणी, हनुमंत हावगी कल्याणी ( दोन्ही रा. खेडकरवाडी ) असे आरोपींचे नाव आहेत. तर हावगी नारायण कल्याणी ( वय 50 वर्षे, रा.खेडकरवाडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.


याबाबत मयत महिलेच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, मयत हावगी हे आपल्या एका मित्राच्या सांगण्यावरून घरात नेहमीच वाद घालायचे. तर त्यांच्या याच मित्राने खोट्या स्वाक्षरी घेऊन चार एकर जमीन बळकावली. मात्र तरीही हावगी कल्याणी हे नेहमी त्याच्या सोबत राहून दारू पितात. दारू पिऊन घरात मुलांना मारहाण करायचे. त्यामुळे घरात रोज वाद व्हायचा. दरम्यान उरलेली शेती करण्यासाठी दोन्ही मुले शेतात गेले असता त्यांचा वडिलांसोबत पुन्हा वाद झाला. ज्यातून त्यांनी वडिलांचा जीव घेतला. 


वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुले पुण्याला गेली...


वडिलांनी चार एकर जमीन मित्राच्या नावावरून करून टाकली. त्यांनतर घरात रोज दारू पिऊन वाद घालत असल्याने दोन्ही मुलं या त्रासाला कंटाळे होते. त्यामुळे गाव सोडून नोकरी करण्यासाठी ते पुण्याला गेले. मात्र आपल्या मुलांनी घरातील कागदपत्रे चोरून नेल्याची तक्रार हावगी कल्याणी यांनी पोलिसात दिली. त्यामुळे त्यांना परत यावे लागले. घरी आल्यावर उरलेली शेती करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांनतर सुद्धा वडिलांकडून सुरु असलेला त्रास काही बंद होत नव्हता. त्यामुळे दोन्ही भावांनी मिळून वडिलांची हत्या केली. 


आधी पाय बांधले, त्यांनतर...


घरातील वाद त्यात नोकरीही गेली. त्यामुळे सचिन आणि हनुमंत या दोन्ही भावांनी उरलेली शेती करण्याचा निर्णय घेतला. गावाकडे पाऊस पडला असल्याने शेतीतील मशागत करत पेरणी करण्याचा दोघांनी ठरवले. त्यासाठी ते शेतात गेले होते. पण तीतेही वडिलांनी वाद घालायला सुरवात केली. वाद एवढ्या विकोपाला गेला की दोन्ही भावांनी पित्याची हत्या करण्याच ठरवलं. त्यामुळे वडिलांचे आधी एका दोरीने पाय बांधले, त्यांनतर छातीवर बसून दुसऱ्या दोरीने गळा आवळला. ज्यात हावगी कल्याणी यांचा जागीच मृत्यू झाला.