Heart Attack while Dancing Viral Video : कधी कुणाला काय होईल हे सांगता येणं अवघड झालं आहे. हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याचं प्रमाण आता तरुणांमध्येही जास्त दिसत आहे. अनेकदा खेळता-खेळता तरुणांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. अलिकडच्या काळात ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चालता-बोलता ह्रदविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहे. आता अशीच एका घटना समोर आली आहे. एका तरुणाचा डीजेच्या तालावर नाचता-नाचता अचानक मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
DJ च्या तालावर नाचताना तरुणाचा मृत्यू
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण डीजेच्या तालावर आनंदानं नाचत आहे. उपस्थितांपैकी एक जण या तरुणाचा नाचतानाचा व्हिडीओ चित्रित करत आहे. तरुण गाण्याच्या तालावर नाचत आहे. मात्र अचानक हा तरुण तोंडावर खाली कोसळतो आणि सर्वच जण चकित होतात. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
दरम्यान, डीजेच्या तालावर नाचणाऱ्या एका युवकाचा खाली कोसळत मृत्यू झाल्याची घटना नांदेडमधील आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी गावातील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 18 वर्षीय विश्वनाथ जाणगेवाड याचा लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर नाचताना खाली कोसळून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (25 फेब्रुवारी) सांयकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या तरुणाचा ह्रदयविकाराचा झटका मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
आरोग्याची काळजी घ्या...
सध्याच्या व्यस्त आणि धावत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो. असंतुलित आहार, व्यायाम तसेच शारीरिक हालचाली कमी होत असल्याने हृदयविकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. चुकीच्या सवयींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हृदयविकाराचा त्रास वाढत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊ शकतो. अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी त्यांची चुकीच्या पद्धतीची जीवनशैली कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :