नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या नेत्यांमध्ये वाक युद्ध सुरू झालं आहे. पक्ष बदलला म्हणून दुसऱ्याने देखील पक्ष बदलला. परंतु मी कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही, नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर टीका केली. नांदेडच्या अर्धापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी ही टीका केली.
मी परिस्थितीने लहान कार्यकर्ता असलो तरी स्वाभिमानी आहे. कुणापुढे झुकलो नाही, आणि या पुढे आयुष्यात कधी झुकणार नाही, मी आतापर्यंत 18 निवडणुका लढवल्या आणि त्यापैकी 16 निवडणुका जिंकल्या. मागच्या दाराने कधीच गेलो नाही, माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार नव्हते, मागच्या दारातुन जायला. मागच्या दाराने राज्यसभेवर गेलेले खासदार अशोक चव्हाण यांना प्रताप पाटील चिखलीकरांनी टोला लगावला. जे काही आहे ते जनतेसमोर निवडणूक लढल्या आणि जिंकल्या असे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) म्हणाले.
Pratap Patil Chikhlikar: नेमकं काय म्हणालेत प्रताप पाटील चिखलीकर?
पक्ष बदलला म्हणून दुसऱ्याने देखील पक्ष बदलला. परंतु मी कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही, मी परिस्थितीने लहान कार्यकर्ता असलो तरी स्वाभिमानी आहे. कुणापुढे झुकलो नाही, आणि या पुढे आयुष्यात कधी झुकणार नाही, मी आतापर्यंत 18 निवडणुका लढवल्या आणि त्यापैकी 16 निवडणुका जिंकल्या. मागच्या दाराने कधीच गेलो नाही, माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार नव्हते, मागच्या दारातुन जायला. जे काही आहे ते जनतेसमोर निवडणूक लढल्या आणि जिंकल्या असं चिखलीकर म्हणालेत.
Pratap Patil Chikhlikar: 'काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही! - अशोक चव्हाण
दरम्यान काही दिवसांपूर्वीच खासदार अशोक चव्हाण यांनी देखील चिखलीकरांवर तोंडसुख घेतलं होतं. काही लोकांना तर माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, अशा शब्दात खासदार अशोक चव्हाण यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला लगावला होता.नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रातील टॉप टेन जिल्ह्यांमध्ये असला पाहिजे ही माझी भावना आहे आणि त्यासाठीच मी काम करतो. त्यामुळे अशा प्रकारांना मी महत्त्व देत नाही आणि त्याने मला काही फरकही पडत नाही, असे सांगत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्यावर पलटवार केला होता. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे दोघे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.