नांदेड: नांदेडमध्ये सक्षम ताटे याची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली होती. मृत सक्षम ताटे याच्या निवासस्थानी ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी भेट दिली.यावेळी माध्यमांसोबत बोलताना सदावर्ते यांनी कुटुंबाने जर परवानगी दिली तर आम्ही त्यांची केस लढू असं म्हटलं. येणाऱ्या संविधान दिनापर्यंत आरोपी फाशी पर्यंत कसे जातात त्यासाठी आम्ही नक्की लढू असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
सक्षम ताटे याची हत्या बंदुकीची गोळी हत्या, ठेचून हत्या आहे. ही हत्या जगाला दखल घ्यायला लावणारी आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. प्रेमामध्ये एवढ्या प्रकारची निघृण हत्या करणं ही विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. मानवी शरीराला त्रास देऊन तडपून तडपून मारलं जाऊ शकतं. निघृण प्रकारे केलेली हत्या आहे. या हत्येच्या संदर्भात एक गोष्ट समोर आली आहे ज्याची दखल घेतली पाहिजे, असं सदावर्ते यांनी म्हटलं.
प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे. प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही. केवळ अनुसूचित जातीचा मुलगा आहे सक्षम ताटे, त्यानं इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची हत्या होणं ही संविधानाच्या विरुद्ध आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टानं सांगितलंय, प्रेम असतं तेव्हा त्याला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे. काही लोकं माथेफिरू असतात, गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं असतात. मामीडवार कुटुंबानं ज्या गोष्टी केल्या , ज्या त्रासदायक आहे, कायदाबाह्य आहेत, त्या जबाबात विचारल्या गेल्या नाहीत, त्या एफआयआरमध्ये आल्या नाहीत. त्या गोष्टी पोलीस डीवीयएसपी, पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करुन त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळं दुसरा एफआयआर नोंदवण्यास सांगितल्याचं सदावर्ते म्हणाले.
सक्षम ताटेच्या आई-वडील, आणि आचल मामीडवारला संरक्षण द्यावं: गुणरत्न सदावर्ते
धीरज कोमुलवार नावाचा पोलीस आहे, असे अपप्रवृत्त आहेत ते वर्दीला डाग लावून जातात, असं सदावर्ते म्हणाले. 27 नोव्हेंबरला आचल मामीडवारला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिनं खोटी पोलीस तक्रार देण्यास नकार दिला.हिमेश मामीडवारनं आचलचा मोबाईल फोडला. सक्षम ताटेविरुद्ध तक्रार देण्यासाठी तिला पोलीस स्टेशनला मारहाण केली, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
सक्षम ताटेची हत्या केल्यानंतर आचल मामीडवारला घेऊन आरोपी पसार झाले. आरोपीला अटक करुन आणल्यानंतर पोलीस ठाण्यात धमक्या देण्यात आल्या, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
पोलीस अधिकारी डीवायएसपी प्रशांत शिंदे यांनी त्यांनी मला सांगितलं की ते गुन्हा दाखल करतील, असं सदावर्ते म्हणाले. सक्षम ताटेच्या आई, वडील आणि आचल मामीडवारला पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणी केल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.