Nanded Recue Operation : महाराष्ट्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये नद्यांना पूर आला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या घटनेनंतर मदत कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे. सैन्य दलाची एक संपूर्ण तुकडी हसनाळ गावाकडे मदत कार्यासाठी रवाना झाली आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसात या गावातील पाच जण वाहून गेले. त्यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागले असून, एकाचा शोध अजूनही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील हसनाळ पमू गावात पुरात वाहून गेलेल्या चौथ्या महिलेचा मृतदेह सापडलाय. ग्रामस्थ चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा मृतदेह पुराच्या पाण्यात सापडलाय. मात्र अद्याप ही एक जण बेपत्ता असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिलीय. रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात हसनाळ गावात पाच लोकं वाहून गेली होती. त्यातील आतापर्यंत 4 लोकांचे मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले आहेत.
मुखेड तालुक्यात अद्याप बचावकार्य सुरूच, सैन्यदलाची एक पूर्ण तुकडी रवाना
मुखेड तालुक्यात अद्याप बचावकार्य सुरूच असून यातील चार गावात 293 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आलीय. ज्यामध्ये रावणगाव येथून 225 जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर हसनाळ येथून 8 जणांना बाहेर काढले असून भासवाडीतून 20, भिंगोली येथून 40 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. एसडीआरएफच्या पथकाने हे बचावकार्य पूर्ण केले आहे. दरम्यान हसनाळ गावात झालेल्या ढगफुटीनंतर मदत कार्यासाठी सैन्यदलाला आता पाचारण करण्यात आले आहे. सैन्यदलाची एक पूर्ण तुकडी हसनाळ गावाकडे मदतकार्यासाठी रवाना झाली आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात या गावातील पाच लोकं वाहून गेली होती. त्यात आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले असून अद्याप ही दोघांचा शोध सुरू आहे.
आम्हाला मदत जाहीर करा, शेतकऱ्याची सरकारकडे अर्त हाक
हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचे झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरलं आणि त्यामुळे शेतातील पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. पूर्णा कयाधू आणि पैनगंगा या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीच अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जवळ असलेले पूर्ण पैसे खर्च करून शेतामध्ये पिकाची पेरणी केली, जोपासना केली, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे पिक उध्वस्त झालीय. त्यामुळे शेतकरी आता सरकारकडून अपेक्षा लावू लागला आहे.
ही बातमी वाचा: