Namak Upay : आपला एक दिवसही असा जाणार नाही, ज्या दिवशी आपण मीठाचा (Salt) वापर करत नाही. जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठाची गरज पडतेच. मीठ फक्त जेवणाचीत चव वाढवत नाही, तर ज्योतिषशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात मिठाशी (Salt Remedies) संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा वापर करून ग्रह दोष दूर करता येतात.


मिठाच्या उपायांमुळे केवळ आर्थिक लाभच होत नाहीत, तर तुमचं एकूणच नशीब बदलू शकतं. मिठाचे उपाय घरातील वाईट शक्ती काढून टाकण्यास मदत करतात. मीठाशी संबंधित असेच काही खास उपाय (Vastu Tips) जाणून घेऊया.


या उपायाने मानसिक तणाव होईल दूर


कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण दूर करण्यासाठी मीठ उपयु्क्त ठरू शकतं. मीठाचे उपाय सर्व समस्या सोडवू शकतात. तुमचं मन कोणत्याही कारणाशिवाय चिंताग्रस्त असेल किंवा तुम्हाला उगाच ताण जाणवत असेल तर तुम्ही मीठाचा एक उपाय करू शकता. यासाठी एका हाताच्या मुठीत मीठ घेऊन ते स्वतःवर 7 वेळा फिरवा आणि पाण्यात टाका. काही वेळातच तुमची अस्वस्थता पूर्णपणे दूर होईल.


आर्थिक संकट होईल दूर


आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात मीठ मिसळून घराच्या नैऋत्य दिशेला ठेवा. ग्लासमध्ये मीठ भरलेलं पाणी 15 दिवसातून एकदा बदलत राहा. असं मानलं जातं की, हा उपाय केल्याने घरातील समस्या काही दिवसातच दूर होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती सुधारू लागते. 


या उपायाने नकारात्मक ऊर्जा होईल दूर


मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचंही काम करतं. घर पुसताना पाण्यात चिमूटभर मीठ टाका. हा उपाय केल्याने वाईट शक्ती घरातून निघून जाते. आठवड्यातून दोनदा घरातील लादी मीठाच्या पाण्याने पुसल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. काचेच्या कपात मीठ भरून बाथरूममध्ये ठेवल्याने सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.


लक्ष्मीची राहील कृपा


एका काचेच्या कपात मीठ भरून त्यात चार-पाच लवंगा टाका. हा उपाय केल्याने घरावर लक्ष्मीची कृपा राहते आणि आशीर्वाद मिळतो. मुलांना आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने आंघोळ घालावी, असं केल्याने मुलांना वाईट नजरेचा त्रास होत नाही.


मीठ घरगुती वाद दूर करते


जर पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असतील किंवा घरात तणाव असेल तर हा मिठाचा उपाय नक्की वापरा. यासाठी काचेच्या भांड्यात रॉक सॉल्ट टाका आणि ते तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. यामुळे खोलीतील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Vastu Tips : जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...