नागपूर : गळ्यात आणि हातापायात दोरी बांधून मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात महाराजा लॉजमध्ये काल (7 जानेवारी) संध्याकाळी ही घटना घडली आहे. मृत हा 27 वर्षीय तरुण असून तो इंजिनिअर आहे.


या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मृत तरुण आणि त्याची 22 वर्षीय मैत्रीण या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेम संबंध आहे. काल दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजमध्ये गेले आणि एक खोली बुक केली. तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये शाररिक संबंध झाले. यावेळी कुछ नया करण्याच्या नादात तरुणाने काही तरी वेगळा करण्याचा प्रस्ताव दिला, तरुणीने तो मान्य केला.


Badaun gangrape case | अंगणवाडी सेविकेवर सामूहिक बलात्कार करत हत्या; मुख्य आरोपी अटकेत


दोघांनी दोरीचा उपयोग करत खुर्चीवर तरुणाचे हात आणि पाय दोरीने बांधले पुढे तीच दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा गुंडाळली. थोड्या वेळाने तरुणी स्वच्छता गृहात गेली. मात्र, खुर्चीवर दोरीने बांधलेला तरुण तसाच होता. काही वेळाने तो खुर्चीसह खाली कोसळला, दुर्दैवाने त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जेव्हा ती तरुणी स्वच्छता गृहातून बाहेर आली, तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणीने लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना दिली. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.


नागपुरात गुंडाकडून शिक्षिकेला केसांना धरुन रस्त्यावर ओढत विनयभंग, विरोध करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण


सुरुवातीला ही घटना कशी घडली हे कोणालाही कळले नाही. अखेरीस तरुणीने पोलिसांना माहिती दिली आणि घटनेचा उलगडा झाला. तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.